Video | शिल्पा शेट्टी हिच्या पतीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, राज कुंद्रा याची जबाबदारी फराह खानवर? ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Oct 09, 2023 | 5:38 PM

शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

Video | शिल्पा शेट्टी हिच्या पतीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, राज कुंद्रा याची जबाबदारी फराह खानवर? तो व्हिडीओ व्हायरल
Follow us on

मुंबई : शिल्पा शेट्टी हिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) हा कायमच चर्चेत असतो. राज कुंद्रा याच्यावर काही दिवसांपूर्वीच अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर थेट काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही राज कुंद्रा याच्यावर आली. राज कुंद्रा हा बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. बिग बाॅस 17 (Bigg Boss 17) मध्ये राज कुंद्रा हा मोठे काही खुलासे करू शकतो असेही सांगितले जातंय. मात्र, अजून ही स्पष्ट झाले नाहीये की, बिग बाॅस 17 मध्ये राज कुंद्रा हा सहभागी होणार की नाही.

शिल्पा शेट्टी हिच्या पतीच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. राज कुंद्रा याने एका व्हिडीओमध्ये थेट म्हटले होते की, पापाराझी यांनी मला दोन वर्षांमध्ये प्रचंड प्रेम दिले. मी काय घातले आणि उर्फी जावेद हिने काय नाही घातले यावरच फक्त आणि फक्त पापाराझी यांच्या नजरा असतात. राज कुंद्रा याचे हे बोलणे उर्फी जावेद हिला अजिबातच आवडले नसल्याचे दिसले.

उर्फी जावेद हिने थेट एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत राज कुंद्रा याचा चांगलाच समाचार घेतला. उर्फी जावेद थेट म्हणाली की, लोकांचे कपडे काढणाऱ्या व्यक्तीला अजिबात माझ्या कपड्यांवर बोलण्याचा अधिकार नाही. इतकेच नाही तर थेट राज कुंद्रा याला पाॅर्न किंग असेही उर्फी जावेद हिने म्हटले. यानंतर लोक राज कुंद्रावर टिका करताना दिसले.

आता राज कुंद्रा हा परत एकदा चर्चेत आलाय. राज कुंद्रा हा बाॅलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याची जोरदार चर्चा ही गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसतंय. आता यावरच अत्यंत मोठा खुलासा झालाय. राज कुंद्रा याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये फक्त राज कुंद्रा हाच नाही तर फराह खान आणि मुनव्वर फारूकी दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये राज कुंद्रा हा मध्यभागी बसलाय. त्याच्या एका बाजूला फराह खान आणि दुसऱ्या बाजूला मुनव्वर फारूकी बसलेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आलंय की, पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी फराह खान म्हणते की, या चित्रपटाची निर्मिती मी केली नाहीये हे परत परत म्हणताना फराह खान ही दिसत आहे.

इतकेच नाही तर या चित्रपटाची निर्मिती राज कुंद्रा यानेच केल्याचे सांगताना मुनव्वर फारूकी आणि फराह खान हे दिसत आहेत. यावेळी विचारण्यात आले की, या चित्रपटाचा अभिनेता कोण आहे? यावेळी मुनव्वर फारूकी आणि फराह खान हे राज कुंद्रा याच्याकडेच हात दाखवताना दिसत आहेत. चित्रपटाची स्टोरी देखील राज कुंद्रा याच्यावरच आधारित आहे.