AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईच्या मैत्रिणीसोबत ‘या’ सेलिब्रिटीचे शारीरिक संबंध, आता गर्लफ्रेंडसोबत अडकला विवाहबंधनात

आईच्या मैत्रिणीसोबत 'या' सेलिब्रिटीचे शारीरिक संबंध, आता गर्लफ्रेंडसोबत मोठ्या थाटात लग्न केल्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत... अभिनेत्याने लग्नाचे आणि लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो केलेत सोशल मीडियावर पोस्ट... फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

आईच्या मैत्रिणीसोबत 'या' सेलिब्रिटीचे शारीरिक संबंध, आता गर्लफ्रेंडसोबत अडकला विवाहबंधनात
| Updated on: Nov 10, 2023 | 2:11 PM
Share

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : झगमगत्या विश्वातून कायम सेलिब्रिटींचे मैत्री, प्रेमप्रकरणं, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट… या विषयांवर कायम चर्चा रंगलेल्या असतात. आता देखील एका प्रसिद्ध सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल तुफान चर्चा रंगत आहे. सध्या ज्या सेलिब्रिटीबद्दल चर्चा रंगत आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून ‘लॉक अप’ आणि ‘स्प्लिट्सविला’ फेम शिवम शर्मा आहे. शिवम शर्मा याने गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. पण लग्नापूर्वी शिवम शर्मा याचे त्याच्या आईच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध असल्याचा खुलासा खुद्द शिवम याने एका शोमध्ये केला होता.

शिवम याने 7 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं. 6 नोव्हेंबर रोजी शिवम आणि समायरा ठाकूर यांनी साखरपुडा केला. लग्नापूर्वी शिवम आणि समायरा यांनी रोमाँटिक प्री-वेडिंग फोटोशूट देखील केलं. सध्या शिवम त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे.

शिवम आणि समायरा यांचं लग्न झाल्यामुळे सोशल मीडियावर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा शिवम याने अभिनेत्री कंगना रनौत हिच्या ‘लॉकअप’ शोमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला होता.

आईच्या मैत्रिणीच्या सहमतीने आमच्यात शारीरिक संबंध होते. त्या महिलेचा घटस्फोट झाला होता आणि ही फार जुनी गोष्ट आहे… असा मोठा खुलासा शिवम याने केला होता. ज्यामुळे सर्वत्र शिवम याची चर्चा रंगली होती. आता शिवम त्याच्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.

शिवम आणि समायरा यांच्या लग्नात अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर शिवम आणि समायरा यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शिवम आणि समायरा यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

शिवम याच्याबद्दल सांगायचं झालं तर, शिवम मॉडेल आहे. ‘दिल तो आज फिर जीने की तमन्ना है’ मालिकेतून शिवम याने अभिनय विश्वात पदार्पण केलं. सोशल मीडियावर देखील शिवम कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिवम कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...