AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ देवीचा माझ्यात अंश..; नवरात्रनिमित्ताने शिवानी सोनारने सांगितली तिची अध्यात्मिक बाजू

अभिनेत्री शिवानी सोनार सध्या 'तारिणी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवरात्रनिमित्ताने तिने तिच्या अध्यात्मिक बाजूचा उल्लेख केला आहे. यावेळी शिवानी तिच्या स्वभावाविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली.

'या' देवीचा माझ्यात अंश..; नवरात्रनिमित्ताने शिवानी सोनारने सांगितली तिची अध्यात्मिक बाजू
Shivani SonarImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 23, 2025 | 9:51 AM
Share

नवरात्र म्हणजे देवीच्या नऊ रुपांचं महत्त्व सांगणारा, शक्तीचा उत्सव. याच निमित्ताने अभिनेत्री शिवानी सोनार, जी सध्या ‘तारिणी’ या मालिकेत निडर आणि न्यायासाठी लढणाऱ्या अंडरकव्हर पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे, तिने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील एका खास अध्यात्मिक बाजूचा उल्लेख केला. शिवानीने सांगितलं, “चंद्रघंटा देवी ही माझ्या स्वभावाशी अतिशय जुळणारी आहे. तिचं एक रूप धाडसी, रक्षण करणारी असून दुसरं अत्यंत शांत आणि संयमी असं आहे. माझ्या व्यावसायिक जीवनात मी नेहमीच धाडसी आणि आक्रमक निर्णय घेत आली आहे. नवनवीन भूमिका स्विकारताना धैर्य दाखवत आले आहे. पण जेव्हा गोष्ट माझ्या कुटुंबाची येते, तेव्हा मी खूप शांत आणि समजूतदार असते.

“पूर्वी मी थोडी चंचल होते, पण लग्नानंतर माझ्या आयुष्यात स्थैर्य आलं, दृष्टिकोन बदलला. कलाक्षेत्रात स्थैर्य नसतंच, इथं सतत बदल घडत असतात, भूमिका, संधी, स्पर्धा या सगळ्याच्या मध्यवर्ती राहून मला माझ्या आतल्या शिवानीला शांततेनं आणि श्रद्धेनं खंबीर केलं आहे. ‘तारिणी’ या भूमिकेमुळे मला माझ्यातली ही दोन रूपं दाखवण्याची संधी मिळाली आहे. ती बाहेरच्या जगात निडर आणि धाडसी आहे, पण आपल्या माणसांत असताना समजूतदार आणि शांतीप्रिय आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात झालेले बदलच या पात्राला अधिक प्रभावी बनवतात,” असं शिवानीने स्पष्ट केलं.

नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंना साजरं करणारा काळ. अशा वेळी, अभिनेत्री शिवानी सोनारने आपल्या व्यक्तिमत्त्वातली देवी ‘चंद्रघंटा’ ओळखली जी एकाच वेळी अत्यंत धाडसी आणि अंतर्मुख शांत आहे. तिचं हे रूप आजच्या काळातल्या अनेक स्त्रियांना आत्मचिंतन आणि प्रेरणा देतं. ‘तारिणी’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. ‘तारिणी’ मालिकेत शिवानीसोबत अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदा ॲक्शन हिरोच्या भूमिकेत आहे. तो मालिकेत केदारची भूमिका साकारत आहे जो एक अंडरकव्हर पोलीस आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...