सिद्धार्थ जाधवची करामत भारी, परीक्षेला गेला अन् चित्र काढून आला, तरी 35 मार्क कसे मिळाले?

सिद्धार्थ जाधव यानेच त्याच्या आगळ्यावेगळ्या परीक्षेबाबत माहिती दिली. एका मुलाखतीत बोलताना त्यानं या पेपरबद्दल सांगितलं.

सिद्धार्थ जाधवची करामत भारी, परीक्षेला गेला अन् चित्र काढून आला, तरी 35 मार्क कसे मिळाले?
siddharth jadhav
| Edited By: | Updated on: May 05, 2025 | 3:52 PM

Siddharth Jadhav : मराठी कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याची सर्वांना इच्छा असते. हे कलाकार कुठे राहतात, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नेमकं काय चाललंय? हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचं असतं. यातील काही कलाकार हे उच्चशिक्षित आहेत तर काही कलाकारांनी फारसं शिक्षण घेतलेलं नसतानाही आज ते सिनेक्षेत्रात फार मोठ्या स्थानावर आहेत. दरम्यान, मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या शिक्षणाचा किस्सा तर फारच मजेदार आहे. परीक्षेला गेल्यानंतर तो चक्क अभिनेता, दिग्दर्शक प्रभू देवाचं चित्र काढत बसला होता. विशेष म्हणजे तो या पेपरमध्ये 35 मार्क मिळवून काठावर पास झाला होता. हा किस्सा नेमका काय आहे? हे जाणून घेऊ या…

दुपारी तीन वाजता पेपर, पण…

सिद्धार्थ जाधव यानेच त्याच्या आगळ्यावेगळ्या परीक्षेबाबत माहिती दिली. एका मुलाखतीत बोलताना त्यानं या पेपरबद्दल सांगितलं. “अर्थशास्त्राच्या पेपरला मी इतिहासाचा अभ्यास करून गेलो होतो. माझा दुपारी तीन वाजता पेपर होता. मी परीक्षा हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता पोहोचलो होतो,” असा मजेदार किस्सा त्याने सांगितला होता.

मित्राला कॉल केला अन्…

तसेच, परीक्षेला लवकर पोहोचल्यामुळे आता काय करावं? असा प्रश्न मला पडला होता. माझा एक मित्र आहे. तो उच्च न्यायालयात आज वकील आहे. तो दादरला राहायचा. मला त्याचाच नंबर पाठ होता. मी त्याला कॉल केला. मी त्याला कॉल केला आणि सगळं सांगतिलं. त्याने नंतर मला घरी बोलावलं, अशी आठवण भरत जाधवने सांगितली.

परीक्षेत प्रभ देवाचं चित्र काढलं, अन्…

तसेच, माझ्या मित्राने नंतर मला ऑब्जेक्टिव्ह (बहुपर्यायी प्रश्न) प्रश्नांबद्दल सांगितलं. मी त्याच प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि पास झालो. त्याने मला सांगितलं की तीन तास उठू नकोस. मग परीक्षेच्या उरलेल्या काळात काय करावं? हे मला समजत नव्हतं. मला प्रभू देवाचं चित्र काढायला येतं. मी परीक्षेतच प्रभू देवाचं चित्र काढत बसलो. मी फक्त 35 मार्कांचाच पेपर सोडवत बसले. मला अर्थशास्त्र विषयात 35 मार्क मिळवूनच पास झालो, असा मजेदार किस्साही सिद्धार्थ जाधवने सांगितला.