AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या तीन महिन्यांतच अभिनेत्यावर आली बॅगा उचलण्याची वेळ, फोटो व्हायरल, ओळखा पाहू कोण ?

बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे नुकतेच लग्न झाले आहे. त्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो शॉपिंगच्या बॅगा उचलताना दिसत आहे.

लग्नाच्या तीन महिन्यांतच अभिनेत्यावर आली बॅगा उचलण्याची वेळ, फोटो व्हायरल, ओळखा पाहू कोण ?
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 12:00 PM
Share

Sidharth Malhotra Kiara : अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​(Sidharth Malhotra) यांच्या लग्नाला ३ महिने झाले आहेत. लग्नानंतर हे स्टार्स सतत शूटिंगमध्ये व्यस्त असतात. पण अलीकडेच, सिद्धार्थ मल्होत्राला शूटिंगमधून थोडा वेळ मिळताच, तो पतीची जबाबदारी पार पाडताना दिसला. नवरा असण्याचे कर्तव्य बजावताना अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सिद्धार्थने निभावला पती धर्म

खांद्यावर अनेक बॅग्स लटकवलेला सिद्धार्थ मल्होत्राचा फोटोने व्हायरल झाला असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे. या फोटोमध्ये सिद्धार्थ रस्त्याच्या कडेला अनेक बॅग खांद्यावर घेऊन उभा असलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थ मल्होत्राने लिहिले- मी पतीचे कर्तव्य पार पाडत आहे. यासोबतच त्याने कियाराला टॅग करत हार्ट इमोजीही शेअर केले आहे.

कियाराने दिली ट्रीट

त्यासोबतच सिद्धार्थ मल्होत्राने आणखी एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​काहीतरी खाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत सिद्धार्थ मल्होत्राने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘लवकर काहीतरी खाऊया, पुन्हा बॅग उचलायला जायचं आहे. या ट्रीटबद्दल थँक्यू कियारा.

पोस्ट होत्ये व्हायरल

सिद्धार्थ मल्होत्राची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट निळ्या रंगाच्या ट्राऊजरसह घातला आहे. सिद्धार्थ मल्होत्राने हा फोटो शेअर करताच काही वेळातच तो व्हायरल झाला.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कामाबद्दल बोलायचे झाले तर लग्नानंतर कियारा अडवाणीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा पहिला चित्रपट 29 जूनला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची गाणी आणि टीझर रिलीज झाला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रा ​हा सध्या ​’योद्धा’मुळे चर्चेत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.