
दरवर्षी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहन केले जाते. यावर्षी 2 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा करण्यात आला. अनेकजण वाईट गोष्टींचा शेवट करत आनंदाने नव्या आणि सकारात्मक गोष्टींना सुरुवात करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक कलाकार दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. दरम्यान, या दिवशी बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर करून वाद निर्माण केला. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने रावणाचे तोंडभरुन कौतुक केले आहे.
ही अभिनेत्री आहे सिमी गरेवाल. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी सिमी गरेवालने दसऱ्याच्या निमित्ताने एक अशी पोस्ट शेअर केली की, त्यामुळे सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. तिने रावणाची प्रशंसा करत त्याला बुद्धिमान असे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे होते की रावण वाईट नव्हता, फक्त थोडा खोडकर होता.
वाचा: फ्लॅट, फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड… प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?
काय आहे सिमीची वादग्रस्त पोस्ट?
दसऱ्याच्या दिवशी सिमी गरेवालने तिच्या एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये की म्हणाली, “प्रिय रावण, दरवर्षी या दिवशी आपण चांगल्याचा वाईटावर विजय झाल्याचा उत्सव साजरा करतो, पण तांत्रिकदृष्ट्या तुमच्या वर्तनाला ‘वाईट’ ऐवजी ‘थोडं खोडकर’ असे मानले पाहिजे. शेवटी तुम्ही काय केले होते? मी मानते की तुम्ही घाईघाईने एका स्त्रीचे अपहरण केले होते, पण त्यानंतर तुम्ही तिला इतका सन्मान दिला, जितका आजच्या काळात सामान्यपणे स्त्रियांना मिळत नाही. तुम्ही तिला चांगले अन्न, निवारा आणि अगदी महिला सुरक्षा रक्षक (जरी त्या फारशा सुंदर नसल्या तरी) दिल्या.”
tweet
सिमी गरेवाल पुढे म्हणाली, “तुमचा विवाहाचा प्रस्ताव अत्यंत नम्रतेने भरलेला होता आणि नकार मिळाल्यावर तुम्ही कधीही ऍसिड हल्ला केला नाही. अगदी जेव्हा भगवान रामांनी तुम्हाला मारले, तेव्हाही तुम्ही इतके समजूतदार होता की तुम्ही माफी मागितली. मला खात्री आहे की आपल्या संसदेतील अर्ध्याहून अधिक लोकांपेक्षा तुम्ही जास्त शिकलेले होता. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला जाळण्यात आमच्या मनात कोणतीही कटुता नाही. ही फक्त एक परंपरा आहे. दसराच्या शुभेच्छा.” सिमीच्या या पोस्टमुळे वाद इतका वाढला की अभिनेत्रीने ही पोस्ट डिलीट केली.
सिमी गरेवाल यांना झाला जोरदार ट्रोल
एका युजरने तिच्या पोस्टवर नाराजी व्यक्त करत म्हटले, “रावण चांगला माणूस नव्हता, तो एक नीच व्यक्ती होता ज्याने एकदा अप्सरा रंभाशी गैरवर्तन केले होते आणि तिचा पती नलकुबेर याने त्याला शाप दिला होता की जर त्याने भविष्यात कोणत्याही स्त्रीशी असे वर्तन केले तर त्याचे डोके अनेक तुकड्यांत विभागले जाईल. या शापाच्या भीतीनेच रावण माता सीतेजवळ गेला नाही, पण आजचे असुर रावणासारख्या वाईट लोकांची प्रशंसा करत राहतील.”