Zubeen Garg : ‘या आली’ गाण्याच्या गायकाची हत्या? मॅनेजरच्या अडचणीत वाढ, नेमकं काय झालं?

Singer Zubeen Garg: आसाम पोलिसांनी गायक झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमधील मृत्यूला आता हत्या मानत त्यांच्या मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि आयोजक श्यामकानू महंता यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आधी मृत्यूचे कारण स्कूबा डायव्हिंग सांगितले गेले होते, पण आता त्यात हत्येच्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे. सीआयडी तपासासाठी सिंगापूरला जाण्याच्या तयारीत आहे.

Zubeen Garg : या आली गाण्याच्या गायकाची हत्या? मॅनेजरच्या अडचणीत वाढ, नेमकं काय झालं?
zubeen-garg
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 03, 2025 | 11:13 AM

आसाम पोलिसांनी गायिका झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमधील मृत्यू प्रकरणात त्यांचा मॅनेजर सिद्धार्थ शर्माविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यासोबतच ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे आयोजक श्यामकानू महंता यांचे नावही या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आल आहे. पोलिसांनी बुधवारीच दोघांना अटक केली होती. झुबीन गर्ग महंत यांच्या आयोजित केलेल्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल (एनईआयएफ) मध्ये सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले होते. त्याच्या एका दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

गायक झुबीनच्या मृत्यूच्या प्रकरणात आत्तापर्यंत ४ जणांना अटक झाली आहे. याशिवाय अनेकांची चौकशीही केली जात आहे. यापूर्वीच झुबीन यांच्या पत्नी सैकिया गर्ग यांनी मॅनेजरवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर सीआयडी सतत कारवाई करत आहे. झुबीनच्या मृत्यूच्या प्रकरणाच्या तपास टीमचे प्रमुख एमपी गुप्ता यांनी सांगितले की, पोलिसांची एक टीम सिंगापूरला जाण्यासाठी तयार आहे. आम्ही झुबीनच्या मृत्यूच्या प्रत्येक पैलूची तपासणी करत आहोत. कारण संपूर्ण घटना सिंगापूरमध्ये घडली आहे. म्हणून आम्ही तेथील सरकारशी बोलणी करून तपासाची परवानगी मागितली होती. याबाबत सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत.

वाचा: फ्लॅट, फार्महाऊस, दागिन्यांचा ब्रँड… प्राजक्ता माळीची एकूण संपत्ती किती?

सीआयडीने हत्येचे कलम जोडले

सीआयडीने सुरुवातीला अटक केलेल्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ६१(२) (फौजदारी षड्यंत्र), १०५ अंतर्गत गुन्हा नोंदवली होता. मात्र नंतर या प्रकरणात हत्येचे कलमही जोडण्यात आले आहे. तपास टीमने याबाबत सांगितले, आत्तापर्यंत आम्ही जो काही तपास केला तेवढेच सांगू शकतो. बीएनएसचे कलम १०३ जोडण्यात आले आहे आणि आम्ही या प्रकरणाची पुढील तपासणी करत आहोत.

१९ सप्टेंबरला झुबीनचा मृत्यू झाला होता

झुबीन गर्ग २० सप्टेंबरला सिंगापूरमध्ये होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार होते. हे फेस्टिव्हल श्यामकानू महंता यांनी आयोजित केले होते. मात्र झुबीन यांचा फेस्टिव्हलच्या एक दिवस आधीच मृत्यू झाला. सुरुवातीला सांगितले गेले की त्यांचा मृत्यू स्कूबा डायव्हिंगमुळे झाला आहे. तर पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण बुडणे सांगितले गेले आहे. याच कारणामुळे या प्रकरणाची बारकाईने तपासणी केली जात आहे. झुबीन गर्ग यांच्या मृत्यूनंतर आसाममध्ये ६० पेक्षा जास्त एफआयआर नोंदवले गेले होते. त्यानंतर या प्रकरणात वेग आला आहे.