
बॉलीवुडमधील सदाबहार आणि अत्यंत कर्बगार, विख्यात अभिनेत्री, जी डोळ्यांनीही तितकीच बोलायची, ती म्हणजे स्मिता पाटील. तिला या जगातून जाऊन कित्येक वर्ष उलटंली असली तरी चाहत्यांच्या हृदयात ती अद्यापही जिवंत आहे. मोठे बोलके डोळे, रेखीव चेहरा आणि अभिनयाचं खणखणीत नाणं यामुळे पठडीतली नायिका न बनता ती खऱ्या अर्थाने अभिनेत्री म्हणून पडदा गाजवत होती. त्या काळी ती सर्वात मोठी सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध होतीच, पण आजही तिच्या आठवणी, तिचं काम, अभिनय लोकांच्या मनात ताजा आहे. पण स्मिता पाटील यांचं नशीब चमकावणारी, बदलवणारी एक घटना रस्त्यावरर पडलेल्या एका फोटोशी निगडीत होती, हे तुम्हाला माहीत आहे का ? एका फोटोने त्यांचं अख्ख नशीब बदललं.
स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 साली रोजी मुंबईत झाला. त्यांनी मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर मुंबईच्या दूरदर्शनसाठी मराठीत बातम्या वाचण्यास सुरुवात केली. त्यांच्या मधुर आवाजामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना दूरदर्शनच्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता मिळाली. मात्र त्यांची मैत्रिणी ज्योत्स्ना किरपेकर यांचे पती, फोटोग्राफर दीपक किरपेकर हे स्मिता यांचा फोटो दूरदर्शन केंद्रात घेऊन गेल्यावर सगळं बदललं. रस्त्यात त्यांचा फोटो खाली पडला आणि तोच फोटो त्यावेळचे दूरदर्शनचे डायरेक्टर, पी.व्ही. कृष्णमूर्ती यांची नजर त्यावर पडली.
बातमी निवेदिका म्हणून करिअरची केली सुरूवात
जेव्हा दीपकने त्यांना स्मिता बद्दल सांगितले तेव्हा त्यांनीने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. स्मिता सुरुवातीला कचरली, पण नंतर तिने ऑडिशन दिले. या काळात तिने बांगलादेशचे राष्ट्रगीत “अमर शोनार बांगला” गायले आणि दिग्दर्शक खूपच प्रभावित झाले, ज्यांनी लगेचच तिला न्यूज अँकर म्हणून निवडले. ही भूमिका तिच्या कारकिर्दीचा पाया बनली.
स्मिता पाटील यांचे चित्रपट
समांतर चित्रपटातून स्मिताने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी त्यांना टेलिव्हिजनवर पाहिले आणि त्यांच्या चित्रपटात कास्ट केले. त्यानंतर स्मिता यांनी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले. “अर्थ,” “मंझिल,” “भविश्य,” आणि “आरक्षण” असे अनेक चित्रपट गाजले, आणि ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. गंभीर सामाजिक मुद्द्यांना स्पर्श करणाऱ्या भूमिका साकारून स्मिता यांनी सिनेमाची नवी परिभषा निर्माण केली.
खासगी आयुष्य
वैयक्तिक आयुष्यात, स्मिता यांनी अभिनेता राज बब्बरशी लग्न केले. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर अजूनही बॉलिवूडमध्ये काम करत आहे. मात्र प्रतीकच्या जन्मानंतर अवघ्या काही काळाने 13 डिसेंबर 1986 साली त्यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्री, चाहते आणि देशाला मोठा धक्का बसला.