Nana Patekar : ‘दादा, दुसऱ्या जगात भेटू!’ नाना पाटेकरांच्या निधनानंतर स्मृती इराणींची भावुक पोस्ट; शेअर केला स्वयंपाक करतानाचा खास VIDEO

Cooking Video of Nana Patekar : अभिनेत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी दिवंगत अभिनेते नाना पाटेकरांशी निगडीत एक आठवण शेअर केली. त्यांच्याबद्दल पोस्ट करत स्मृती यांनी नाना पाटेकर स्वयंपाक करत असल्याचा एक व्हिडीओही शेअर केला.

Nana Patekar : ‘दादा, दुसऱ्या जगात भेटू!’ नाना पाटेकरांच्या निधनानंतर स्मृती इराणींची भावुक पोस्ट; शेअर केला स्वयंपाक करतानाचा खास VIDEO
| Updated on: Oct 08, 2026 | 6:11 PM

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांचं वयाच्या 75 व्या वर्षी निधन झालं, गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून चित्रपटसृष्टीवरही शओककळा पसरली आहे. अभिनेते, कलाकार, खेळाडू, राजकारणी, सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी नाना पाटेकरांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनी नानांच्या निधनानंतर एक पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्या नानांना ‘दादा’ अशी हाक मारायच्या. गुरूवारी, नानांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर स्मृती इराणी यांनी नानांशी निगडीत कताही भावूक करणाऱ्या आठवणी शेअर केल्या. नानांसोबत अनेक आठवणी आहे,, पण त्यांच्यासोबत स्वयंपाक करतानाची आठवणल खूप खास, सर्वांत आवडती असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याच्याशी निगडीत एक व्हिडीओ देखील स्मृती यांनी शेअर कला आहे, ज्यामध्ये नाना पाटेकर हे स्वयंपाक करताना दिसत आहेत. नाना यांच्याशी शेवटचं बोलणं काय झालं, तेही स्मृती इराणी यांनी शेअर केलं.

स्मृती यांची खास पोस्ट

Loading...

भाजप महासचिव स्मृती इराणी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केली. त्यांनी लिहीलं – ‘ दादा, मी त्यांना याच नावाने हाक मारायचे. जग तयांना नाना पाटेकर या नावाने ओळखत असले तरी मी दादा म्हणायचे. त्याचे फोन अचानक यायचे, पण माझ्यााठी ते खूप मौल्यवान होते. कोणताही औपचारिकपणा नाही, कोणत्याही दिखाऊ गोष्टी नाहीत. फक्त तीच ओळखीची आवाजातील हाक—‘कुठे आहेस ?’” – असं त्यांनी त्यात नमूद केलं.

कधीही विचार केला नव्हता…

स्मृती इराणी यांनी भावुक होत पुढे लिहिलं — ‘आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांची कदाचित क्वचितच फोटो काढले. एक दिवस असा येईल आणि माझ्याकडे त्यांच्या फक्त आठवणींच्या रूपात फोटोच उरतील, असा विचारही कधी केला नव्हता.
मी त्यांना अचानक फोन करायचे. कधी-कधी फक्त यासाठी की, एखाद्या तरुण आणि गुणवान कलाकाराची त्यांच्याशी गाठ घालून द्यावी, जो त्यांचा चाहता असेल. आणि तेही अगदी आनंदाने त्याच्याशी बोलायचे. त्यांच्या कठोर बाह्य व्यक्तिमत्त्वामागे दडलेला स्नेह आणि आपलेपणा त्यांच्या बोलण्यातून जाणवायचा.’ असं स्मृती यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं.

 

शेअर केला खास व्हिडीओ

” माझ्या सर्वांत जिव्हाळ्याच्या आठवणींपैकी एक म्हणजे त्यांनी माझ्यासाठी स्वयंपाक केलेला तो प्रसंग. कोणताही विशेष प्रसंग नव्हता. फक्त दादा होते—त्यांच्या अगदी खास, साध्या आणि मनमोकळ्या अंदाजात.” – असं त्यांनी पुढे लिहीलं. ” आमचं शेवटंच बोलणं अजूनही स्मरणात आहे. पुण्याला कधी येशील ? असं त्यांनी मला विचारलं होतं, मी म्हटलं – लौकरच. पण आता तो क्षण कधी येणार नाही. दुसऱ्या जगात भेटू, दादा ! ” असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या असून अनेकांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us