
बॉलिवूडमधील काही जोड्यांचे लग्न हे कायमच चर्चेत राहिलेलं आहे. काहींची जोडी पसंत केली गेली तर काहींना ट्रोल केलं गेलं. बॉलिवूडमधील अशीच एक जोडी ज्यांच्या लग्नानंतर त्यांना अनेकदा ट्रोल केलं गेलं पण काही चाहत्यांनी त्यांच्या जोडीला पसंतीही दर्शवली. ही जोडी म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर.
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नावेळी निर्माण झालेला वाद
सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आंतरधर्मीय विवाहासाठी त्यांना बरीच टीका आणि विरोध सहन करावा लागला, परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी लग्न केले. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान सैफची बहीण सोहा अली खानने सैफ आणि करीनाच्या लग्नाबद्दल उघडपणे सांगितले. तिने खुलासा केला की सैफ आणि करीनाच्या लग्नाच्या वेळी अनेक विचित्र बातम्या समोर आल्या होत्या. सोहा म्हणाली, “जेव्हा करिना आणि माझ्या भावाचे लग्न झाले तेव्हा ‘लव्ह जिहाद’ आणि ‘घर वापसी’ सारख्या विचित्र बातम्या येत होत्या.”
आंतरधर्मीय विवाहामुळे वाद, ट्रोलिंग
सोहाने असेही सांगितले की, तिच्या आंतरधर्मीय विवाहादरम्यान, जेव्हा तिने कुणाल केम्मूशी लग्न केले तेव्हा देखील तिला अशाच प्रकारचा द्वेष आणि टीका सहन करावी लागली. ती म्हणाली, “अनेक लोक द्वेषपूर्ण टिप्पण्या करतात, अनेक आवाज उठवले जातात आणि ते ठीक आहे. मला प्रत्येकाच्या मतांची पर्वा नाही. मी ज्या लोकांवर प्रेम करते, ज्यांची काळजी घेते आणि ज्यांचा आदर करते ते माझ्यासोबत आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”
सैफने सोहाला त्याच्या आणि करीनाच्या नात्याबद्दल कसं सांगितलं?
तसेच सोहाने एका मुलाखतीत सैफ अली खानने करीना कपूरसोबतच्या त्याच्या नात्याची बातमी तिला कशी सांगितली याचा देखील तिने खुलासा केला. सोहा म्हणाली, “मला आठवतंय की मी कुठेतरी शूटिंग करत होतो तेव्हा भाईने मला फोन केला आणि म्हणाला, ‘मला तुला सांगायतं आहे की माझी गर्लफ्रेंड तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.’मी म्हणाले, ‘ठीक आहे, छान.’ हा त्याचा माझ्याशी संवाद झाला होता.” सोहा पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही एखाद्या सुपरस्टारला भेटता तेव्हा तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काही विशिष्ट कल्पना असतात. पण मी अशा लोकांपैकी नाही जे त्यांना न भेटता त्यांच्याबद्दल मत बनवते. मला वाटते की त्यांना समजून घेण्यासाठी तुम्हाला त्यांना भेटण्याची आवश्यकता आहे.”
कसं आहे सोहा आणि करीनाचे नाते
सोहा अली खानने तिच्या आणि करिनासोबतच्या नात्याबद्दल देखील सांगितले. ती म्हणाली की तिचे नाते आणि करीनाचे नाते हळूहळू अधिक घट्ट होत गेले. ती म्हणाली की, “पहिल्या काही भेटींमध्ये मला करीनाला समजून घेण्याची संधी मिळाली नाही. एखाद्याशी नाते निर्माण करण्यासाठी वेळ, विश्वास आणि सातत्य आवश्यक असते. करिना आणि माझ्यासोबतही असेच घडले. गेल्या 10-12 वर्षांत अनेक घटनांनी आम्हाला जवळ आणले आहे.”
सध्या मात्र सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे बॉलिवूडमधील सर्वात आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांची प्रेमकहाणी 2008 मध्ये आलेल्या “टशन” चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, दोघांनी 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले.