AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर खान कुटुंबियांच्या पूर्व सूनेची गगन भरारी… नवऱ्याला सोडताच नवीन सुरुवात…

खान कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. आता खान कुटुंब पूर्व सूनेमुळे चर्चेत आलं आहे. कुटुंबियांचा निरोप घेतल्यानंतर तिना गगन भरारी घेतला... नवऱ्याला सोडल्यानंतर सीमा हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली.

घटस्फोटानंतर खान कुटुंबियांच्या पूर्व सूनेची गगन भरारी... नवऱ्याला सोडताच नवीन सुरुवात...
| Updated on: Jun 05, 2026 | 3:09 PM
Share

बॉलिवूडच्या प्रतिष्ठित कुटुंबियांपैकी एक असल्याने खान कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. तर अभिनेता सलमान खान याच्यामुळे देखील खान कुटुंबातील प्रत्येक सदस्याची चर्चा रंगत असते. आता खान कुटुंबियांच्या पूर्व सूनेच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. खान कुटुंबियांची पूर्व सून आणि बॉलिवूड वाइव्स वर्सेज फॅबुलस लाइफ फेम सीमा सजदेह चर्चेत आली आहे. एक काळ असा होता, जेव्हा सीमा खान कुटुंबाची लहान सून होती. सीना हिचं लग्न सोहेल खान याच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सीमा आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर सीमा तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. सीमा आता वेगळ्या घरात राहते आणि तिने नव्या युट्यूब चॅनलची देखील सुरुवात केली आहे… एवढंच नाही तर, तिने स्वतःचं घर देखील तयार केलं आहे.

घटस्फोटानंतर सीमा हिने स्वतःचं घर खरेदी केलं असून, घर सजवत आहे. सीमा नव्या घरात लहान मुलगा योहान याच्यासोबत राहणार आहे… सांगायचं झालं तर, सीमा आणि सोहेल यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मोठा मुलगा निर्वान एकटाच 1 BHK मध्ये राहतो… सीमा रोज निर्वान याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जाते. आता सीमा हिने तिच्या तयार होत असलेल्या घराची एक झलक दाखवली आहे. सीमाचं घर सजवण्याची जबाबदारी इंटीरियर डिझायनर गौरी खान हिच्यावर आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत सीमा म्हणाली, येत्या दोन महिन्यात माझं ताज महाल तयार होणार आहे… योहान याला त्याच्या रुमसाठी काळा रंग हवा होता. पण त्यासाठी मी स्पष्ट नकार दिला आणि नेव्ही ब्लू रंगात त्याची खोली तयार केली आहे. एवढंच नाही तर, सीमा हिने अर्ध तयार झालेलं किचन देखील दाखवलं आहे. ती म्हणाली, ‘मला कुकिंग करायला प्रचंड आवडतं… किचन मोठं असावं असं माझं स्वप्न होतं… अखेर माझं स्वप्न पूर्ण होत आहे. आता मी तुम्हाला चटपटीत डाएट रेसिपी सांगत जाईल…’, असं देखील सीमा म्हणाली..

सीमा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतर सीमा तिच्या पद्धतीत आयुष्य जगत आहे. घटस्फोटानंतर सीमा एक्स बॉयफ्रेंड विक्रम आहुजा याला डेट करत आहे. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. सध्या सीमा तिच्या तयार होत असलेल्या नव्या घरामुळे चर्चेत आहे.

Follow Us
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स