सोहैलच्या मुलाचं नाव असतं ‘राम खान’; पण का तयार नव्हती पूर्व पत्नी सीमा? स्वत:चं सांगितलं कारण

सोहैल खानने 'अलायन्स' या शोमध्ये सांगितलं होतं की त्याला त्याच्या मोठ्या मुलाचं नाव राम असं ठेवायचं होतं. यावर आता त्याची पूर्व पत्नी सीमा सजदेहने प्रतिक्रिया दिली आहे. मुलाचं नाव निर्वाण ठेवण्याबद्दलचा किस्सा तिने सांगितला आहे.

सोहैलच्या मुलाचं नाव असतं राम खान; पण का तयार नव्हती पूर्व पत्नी सीमा? स्वत:चं सांगितलं कारण
Sohail Khan and Seema Sajdeh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 3:25 PM

प्राइम व्हिडीओवरील ‘अलायन्स’ या शोमधून अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नुकतीच बाहेर पडली. या शोमध्ये दोघांमधील मैत्री विशेष चर्चेत राहिली. घटस्फोटानंतरही दोघं या शोमध्ये एकमेकांना पाठिंबा देताना आणि एकमेकांची काळजी घेताना दिसले. या शोमध्ये सोहैलने त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव निर्वाण का ठेवलं, याविषयीचा खुलासा केला होता. इतकंच नव्हे तर मुलाचं नाव राम असं ठेवायचं होतं, असंही त्याने सांगितलं. परंतु सीमाच्या इच्छेपुढे तो काही बोलू शकला नव्हता. यावर आता सीमानेही मौन सोडलं आहे.

‘बॉलिवूड नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत सीमा म्हणाली, “माझ्यासाठीही ही बातमीच होती. मला इतक्या जुन्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण हे मात्र खरंय की निर्वाणचं नाव मीच ठेवलं होतं. मला कोणा दुसऱ्याने सुचवलेल्या नावांचा विचारही करायचा नव्हता. मी त्यासाठी कोणाकडून सल्लाही मागणार नव्हती. निर्वाणचं नाव मलाच ठेवायचं होतं. त्यामुळे हे राम नाव कुठून आलं ते मला माहीत नाही. एवढं नक्की की, त्यावेळी निर्वाणसाठी सोहैलच्या बऱ्याच इच्छा-आकांक्षा होत्या. पण नावाचा शेवटचा निर्णय माझाच असेल, हे त्याला माहीत होतं.” सीमा आणि सोहैल यांना दोन मुलं असून त्यांची नावं निर्वाण आणि योहान अशी आहेत. लग्नाच्या 24 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. मात्र घटस्फोटानंतरही त्यांच्यात चांगली मैत्री आहे.

‘अलायन्स’ या शोमध्ये सोहैलने सांगितलं होतं की, मुलगा निर्वाणचं नाव त्याला ठेवायचं होतं. अली गोणीसोबत बोलताना सोहैलने त्याच्या मनातील ही इच्छा बोलून दाखवली होती. “जेव्हा सीमा गरोदर होती, तेव्हा आम्ही मस्करीत हा निर्णय घेतला होता की, मुलगा झाला तर त्याचं नाव मी ठेवीन. पण जर मुलगी झाली, तर तिचं नाव सीमा ठेवणार. माझी अशी इच्छा होती की, जर मुलगा झाला तर त्याचं नाव मी राम असं ठेवीन. राम खान असं त्याचं नाव असतं. कारण आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. सीमानेही एक नाव ठरवलं होतं. त्यामुळे जेव्हा डिलिव्हरी झाली, तेव्हा निर्वाण आमच्या आयुष्यात आला,” असं त्याने सांगितलं.

यावेळी तो पुढे म्हणाला, “डिलिव्हरीनंतर जेव्हा सीमा शुद्धीवर आली, तेव्हा तिने मला विचारलं, निर्वाण कसा आहे? तेव्हा मी तिचं म्हणणं टाळलं नाही. निर्वाण या नावासाठी मी तयार झालो. नंतर मी कधीच मुलाचं नाव बदलण्याचा विचार केला नाही. कारण त्या नावाने मीसुद्धा खुश होतो.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us