AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षीचं मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न कुटुंबियांना अमान्य, भाऊ म्हणाला, ‘तुम्ही कोणाच्या बाजूने…’

Sonakshi Sinha Marriage | सोनाक्षी सिन्हा आणि मुस्लिम अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नामुळे सिन्हा कुटुंबात नाराजी? अभिनेत्रीचा भाऊ पोस्ट शेअर करत म्हणाला, 'तुम्ही कोणाच्या बाजूने...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी - इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा...

सोनाक्षीचं मुस्लिम अभिनेत्यासोबत लग्न कुटुंबियांना अमान्य, भाऊ म्हणाला, 'तुम्ही कोणाच्या बाजूने...'
| Updated on: Jun 19, 2024 | 11:12 AM
Share

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नामुळे सिन्हा कुटुंबात नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने लग्नाबद्दल वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देखील चर्चा केली नसल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाहीतर, अभिनेत्रीचा भाऊ लव सिन्हा देखील बहिणीच्या लग्नाच्या पूर्वी अनेक सोशल मीडिया पोस्ट करत चर्चेत आला आहे. सोनाक्षीच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान, लवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर क्रिप्टिक कॅप्शनसह स्वतःचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

लव याने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘आज तुम्ही कोणत्या पक्षाच्या बाजून असाल?’ असं लिहिलं आहे. शिवाय लव याने #twoface #duotone #duality #throwback #portrait असे हॅश टॅग देखील वापरले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोनाक्षी भावाला सोशल मीडियावर फॉलो करत नाही…

View this post on Instagram

A post shared by Luv Sinha (@luvsinha)

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा लव सिन्हा याने क्रिप्टिक पोस्ट केली आहे. याआधी देखील लव याने ट्रिपचे फोटो पोस्ट करत ‘वेळेनुसार समस्या अशी आहे की आपल्याकडे वेळ देखील पर्याप्त नसते…’ असं कॅप्शन लिहिलं होतं. सध्या सर्वत्र फक्त लव याच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा…

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नावर भावाचं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी लव याला बहीण सोनाक्षी हिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा लव म्हणाला, ‘मी सध्या मुंबईत नाही. माझं यासंबंधी काहीही घेणं-देणं नाही. यावर प्रतिक्रिया देण्याचा किंवा कोणत्याही प्रकारे अडकण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मला रंगणाऱ्या चर्चांपासून दूर राहायचं आहे… असं अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला. ज्यामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.’

सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल

सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल गेल्या 7 वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. गेल्या एक वर्षापासून दोघे लिव्हइन-रिलेशनशिपमध्ये राहात आहेत… असं देखील सांगितलं जात आहे. सोनाक्षी झहीर याच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. सोनाक्षी – झहीर यांनी एकत्र स्क्रिन देखील शेअर केली आहे. ‘डबल एक्सएल’ सिनेमात दोघंनी एकत्र काम केलं आहे.

Follow Us