
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लूक्स प्रमाणे बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. ती आणि तिचा पती जहीर इक्बाल नेहमीच चर्चेत असतात. विविध ठिकाणी फिरत , ते एकमेकांसोबतच मस्ती, फोटो शेअर करत असतात., हे क्यूट कपल नेहमीच चर्चेत असतं. लग्नानंतर सोनाक्षी आणि झहीर आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहेत. सोनाक्षीच्या गरोदरपणाच्या अफवा अनेक वेळा समोर आल्या आहेत. मात्र आता या चर्चांना जास्तच जोर चढला आहे, त्याला कारण म्णजे नुकत्याच एका इव्हेंटसाठी आलेल्या सोनाक्षीचा लूक..
पती जहीरसोबत सोनाक्षी ही मंगळवारी डिझायनर विक्रम फडणीसच्या पार्टीसाठी आली होती. दोघेही ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसले. ब्लॅक कुर्ता आणि व्हाईट पँटमध्ये जहीर खूप हँडसम दिसत होता. तर सोनाक्षी सिन्हा लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये या इव्हेंटसाठी आलेली दिसली. मात्र त्यावर असलेल्या लाल ओढणीने तिने तिचं पोट काहीसं झाकून घेतलं होतं, त्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला असून तो पाहून सगळे जण फक्त एकच प्रश्न विचारत आहेत.
सोनाक्षी प्रेग्नंट आहे का ?
विक्रम फडणीसच्या पार्टीसाठी आलेल्या जहीर आणि सोनाक्षीने पापाराझींसमोर बऱ्याच पोझ दिल्या, मात्र त्यावेळी सोनाक्षीची ओढणी थोडी बाजूला झाली. ते पाहून तिने लगेच ओढणी सावरली आणि तिचं पोट पुन्हा कव्बर केलं. एवढंच नव्हे तर तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आणि बराच ग्लो ही दिसत होता. हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून ते पाहून सर्व चाहते विविध अटकळी बांधत आहेत. हा तिच्या प्रेग्नन्सीचा ग्लो आहे असं म्हणतं अनेकांनी सोनाक्षीकडे गुड न्यूज आहे का असा सवाल विचारायला सुरूवात केली. चाहत्यांनी या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट्स केल्या. अनेकांनी त्यात सोनाक्षीच्या प्रेग्नन्सीचा अंदाज वर्तवला. हा तर प्रेग्नन्सी ग्लो आहे, अशी कमेंट एकाने केली. अनेकांनी या बातमीला दुजोरा दिला.
मात्र या व्हिडीओवर किंवा संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षी किंवा जहीर यांच्यापैकी कोणीही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया किंवा होकार दिलेला नाही, त्यामुळे चाहते अजूनही गुड न्यूजच्या प्रतीक्षेतच आहेत.
सोनाक्षी-जहीरचं लग्न
सोनाक्षीला अलीकडेच मनीष मल्होत्राच्या पार्टीतही पाहिले गेले होते. झहीरसोबत लग्नाची घोषणा केल्यापासून सोनाक्षी तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्यां दोघांचं 23 जून 2024 मध्ये लग्न झालं. मात्र हे लग्न खूप चर्चेत होत. अशी चर्चा होती की सोनाक्षीचे दोन्ही भाऊ लग्नावर नाराज होते आणि त्यामुळे ते उपस्थित राहिले नाहीत अशा बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, सोनाक्षीचे वडील आणि अभिनेते, शत्रुघ्न सिन्हा यांनी नंतर या अटकळी बंद केल्या. ते म्हणाले, “ते देखील माणूस आहेत. मुलांना धक्का बसला. त्यांना कदाचित अजून तेवढी समज नसेल. मी त्यांचं दुःख, गोंधळ आणि त्रास समजू शकतो. कदाचित मी त्या वयात जगलो असतो तर माझे विचार वेगळे असते.” असं शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं होतं.