
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांची आवडती राहिली आहे. तिच्या चित्रपट कारकिर्दीत तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिलजले, सरफरोश, हम साथ साथ है आणि जिस देश में गंगा रहाता है या सुपरहिट चित्रपटांतील सोनालीच्या मनमोहक शैलीने प्रेक्षकांना वेड लावलं. वर्षानुवर्षे सोनाली बेंद्रे इंडस्ट्रीत सक्रिय आहे. जरी ती बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती टेलिव्हिजनच्या जगात अजूनही आहे. दरम्यान सोनालीने एका शो दरम्यान तिच्या प्रेग्नेंसीबद्दलच्या धक्कादायक गोष्टी उघड केल्या.
या गाण्याच्या शुटींगवेळी सोनाली प्रेग्नेंट होती
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने पहिल्यांदाच ‘अग बाई अरेच्चा’ या मराठी चित्रपटात ‘छम छम करत है’ हे आयटम सॉंग केलं होतं. पण या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सोनाली बेंद्रेने प्रेग्नेंट होती. पण तिला याची काहीच माहिती नव्हती किंवा त्याची कल्पनाच नव्हती. या गाण्याच्या शुटींगसाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान तिला डान्स शिकवत होती . अभिनेत्रीने सांगितले की, फराह जेव्हा जेव्हा तिचे पोट पाहायची तेव्हा ती मोठ्याने हसायची आणि तिची चेष्टा करायची.
शुटींगदरम्यान पोटात बाळ असल्याची कल्पना सोनालीला नव्हती
फराह खान तिच्या युट्यूब चॅनलवर विविध सेलिब्रिटींसोबत स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. त्यासाठी फराह सेलिब्रिटींच्या घरी जाऊन खास रेसीपी तयार करुन घेते. दरम्यान अशातच फराह सोनालीच्या घरी ‘कश्मिरी गुच्ची पुलाव’ हा पदार्थ बनवला. यावेळी सोनाली आणि फराह यांनी अनेक गोष्टीवर चर्चा केला. यावेळी दोघींनी एकत्र डान्सही केला. यावेळी बोलताना फराहनं त्या गाण्याची आठवण काढली होती. ती म्हणाली की, ‘सोनाली आपण दोघींनी अनेक गाण्यात एकत्र काम केलं. यावेळी तिने ‘छम छम करता है’ या गाण्याबद्दलही भाष्य केलं.’ त्यावेळी सोनालीने त्या प्रसंगाची आठवण काढत म्हटलं की, ‘त्या गाण्याचं शुटिंग करताना मी प्रेग्नेंट होते. आणि गाण्याचं शुटिंग सुरु असताना मला याबाबत कल्पना पण नव्हती की माझ्या पोटात बाळ आहे ते.’
फराह खानने सोनालीच केलं कौतुक
फराहने तिला पुढे म्हटलं की, ‘गाणं शुट करताना असं वाटत होतं की, सोनाली इतकी जाड का दिसतेय. मला वाटलं पंजाबी कुटुंबात लग्न केल्यामुळे ती जाड झाली असेल. गाण्याच्या शुटिंगवेळी सुद्धा ती मला जाड दिसत होती. परंतु ती प्रेग्नेंट असल्याचं नंतर मला कळलं.’तसेच पुढे फराहने सोनालीच कौतुक करत म्हटलं की, “तिने तिच्या गरोदरपणात संपूर्ण नृत्य केले. ही खूप मोठी गोष्ट आहे”.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नोव्हेंबर 2002 मध्ये चित्रपट निर्माते गोल्डी बहलशी लग्न केले. सोनालीने 2005 मध्ये तिच्या बाळाला जन्म दिला. सोनालीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने मॉडेल म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर 1994 मध्ये ‘आग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.