‘नशिबवान’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार खलनायिका

गणेशोत्सवाच्या धामधूमीत या नव्या मालिकेचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी खूप खास असल्याची भावना सोनालीने व्यक्त केली. प्रेक्षकांना ही भूमिका आणि 'नशिबवान' मालिका आवडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Aug 21, 2025 | 9:51 AM
1 / 5
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेली 'हळद रुसली कुंकू हसलं' ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता 'नशिबवान' आणि 'लपंडाव' या नव्याकोऱ्या मालिकांच्या प्रोमोने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे. नशिबवान मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली खरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

2 / 5
जवळपास दहा वर्षांनंतर ती पुन्हा मालिकाविश्वात दमदार एण्ट्री घेण्यासाठी सज्ज आहे. याआधी 'बे दुणे दहा' मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली होती. आता 'नशिबवान' मालिकेच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच खलनायिका साकारणार आहे. उर्वशी असं तिच्या पात्राचं नाव आहे.

3 / 5
दिसायला अतिशय सुंदर मात्र रुपाचा प्रचंड असलेली उर्वशी खूप स्वार्थी आहे. ती आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. भावनांना उर्वशीच्या आयुष्यात जागा नाही.

4 / 5
उर्वशी या पात्राबद्दल सांगताना सोनाली खरे म्हणाली, "माझ्या करिअरची सुरुवातच मालिकेनं झाली होती. त्यामुळे टीव्ही हे माझं आवडतं माध्यम आहे. 'नशिबवान' मालिकेत मी उर्वशी हे पात्र साकारणार आहे. पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात दिसणार आहे. त्यामुळे खूप उत्सुकता आहे."

5 / 5
"चित्रपट, वेब सीरिज, माझी निर्मिती संस्था यात मी प्रचंड व्यस्त होते. मात्र तरीही मालिकेत काम करण्याची इच्छा होती. या पात्राविषयी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मला मालिकेचा विषय आणि व्यक्तिरेखा खूपच भावली. उर्वशी अतिआत्मविश्वासू आणि स्वार्थी आहे. हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे, त्यामुळे कस लागतोय," अशी प्रतिक्रिया तिने दिली.