Sonam Kapoor: सोनम कपूरच्या मुलाचं नाव माहितीये का? अर्थही आहे खूप खास!

सोनम कपूरने पहिल्यांदाच पोस्ट केला मुलाचा फोटो; जाहीर केलं नाव

Sonam Kapoor: सोनम कपूरच्या मुलाचं नाव माहितीये का? अर्थही आहे खूप खास!
Sonam Kapoor and Anand AhujaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 6:56 PM

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) आणि आनंद अहुजा (Anand Ahuja) यांच्या घरी 20 ऑगस्ट रोजी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं. आज (मंगळवार) सोनमने बाळाला महिना पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला. यानिमित्त सोनमने इन्स्टाग्रामवर पहिल्यांदाच बाळासोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. मार्च महिन्यात सोनमने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. तिने आनंदसोबतचे प्रेग्नन्सी फोटोशूट इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. लग्नानंतर सोनम लंडनमध्ये स्थायिक झाली. मात्र तिने मुंबईतच बाळाला जन्म दिला.

सोनमने बाळाचा फोटो पोस्ट करत त्याचं नावसुद्धा जाहीर केलं. सोनम आणि आनंदने त्यांच्या मुलाचं नाव ‘वायू’ असं ठेवलं. या नावाचा अर्थसुद्धा तिने सांगितला.

हे सुद्धा वाचा

वायूचा अर्थ-

‘हिंदू धर्मग्रंथांमध्ये वायू हे पंच तत्वांपैकी एक आहे. तो श्वासोच्छवासाचा देव असून हनुमान, भीम आणि माधव यांचा अध्यात्मिक पिता आहे. तो अविश्वसनीय आणि शक्तिशाली वाऱ्याचा देवता आहे. प्राण हासुद्धा वायू आहे. ती विश्वातील जीवन आणि बुद्धिमत्तेची मार्गदर्शक शक्ती आहे. प्राण, इंद्र, शिव आणि काली या सर्व देवता वायूशी संबंधित आहेत. तो जितक्या सहजतेने वाईटाचा नाश करू शकतो, तितक्याच सहजतेने तो जीवन (श्वास) देऊ शकतो. वायूला वीर, शूर आणि मोहक असंही म्हटलं जातं,’ अशी पोस्ट तिने लिहिली आहे.

बाळाला महिना पूर्ण झाल्याचा आनंद सोनमने केक कापून साजरा केला. यावेळी खास बॉस बेबीचा केक त्यांनी ऑर्डर केला होता. या केकचाही फोटो तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. ‘बॉस बेबी कपूर अहुजा’ असं त्या केकवर लिहिण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.