Sonu Nigam | सोनू निगम याचे गंभीर आरोप, थेट शाहरुख खान याला मारला मोठा टोमणा

सोनू निगम हा नेहमीच चर्चेत असतो. सोनू निगम याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच केलेल्या विधानामुळे सोनू निगम हा तूफान चर्चेत आलाय.

Sonu Nigam | सोनू निगम याचे गंभीर आरोप, थेट शाहरुख खान याला मारला मोठा टोमणा
| Updated on: Oct 09, 2023 | 7:12 PM

मुंबई : गायक सोनू निगम हा कायमच चर्चेत असतो. सोनू निगम (Sonu Nigam) याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. सोनू निगम हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. आता नुकताच सोनू निगम याने अत्यंत मोठा खुलासा केलाय. सोनू निगम याच्या घरी काही दिवसांपूर्वीच चोरी झाली. सोनू निगम याच्या घरी चोरी झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोनू निगम याच्या घरी 22 मार्च रोजी चोरी झाली.

सोनू निगम याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. इतकेच नाही तर सोनू निगम याने थेट शाहरुख खान याच्यावर आरोप केलाय. शाहरुख खान हा काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचे हे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत.

शाहरुख खान याच्याबद्दल खुलासा करत थेट सोनू निगम हा म्हणाला की, कलाकार त्यांच्या चित्रपटातील गायकांसाठी भांडतात किंवा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करतात असे मला अजिबातच वाटत नाही. जर खरोखरच तसे असते तर मी आजही शाहरुख खान याच्या चित्रपटांमध्ये गाणी म्हणताना दिसलो असतो ना…

अभिनेत्यांना वाटते की, हा संगीतकार आणि दिग्दर्शकाचा विषय आहे. अभिनेता हा त्याचे सर्वोत्तम देऊ शकतो. तो फक्त आणि फक्त स्वत: ला प्राधान्य देऊ शकतो. तो कोणासाठीही अजिबात लढत नाही. सोनू निगम याने थेट शाहरुख खान याच्यावर थेट टिका केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. आता यावर शाहरुख खान हा काय रिप्लाय देतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच जवान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने मोठा धमाका केला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरुख खान दिसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहरुख खान हा आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करत होता. शाहरुख खान आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन करताना दिसतो.