Sonu Nigam Net Worth | करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे सोनू निगम, लक्झरी गाड्यांचाही शौक!

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला (Sonu Nigam) कोणी ओळखत नाही, असे फारच कमी लोक असतील. सोनू आपल्या मखमली आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. अनेक गाण्यांना आवाज देऊन सोनूने त्यांना चार चांद लावले आहेत.

Sonu Nigam Net Worth | करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे सोनू निगम, लक्झरी गाड्यांचाही शौक!
सोनू निगम
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Jul 31, 2021 | 7:28 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमला (Sonu Nigam) कोणी ओळखत नाही, असे फारच कमी लोक असतील. सोनू आपल्या मखमली आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करतो. अनेक गाण्यांना आवाज देऊन सोनूने त्यांना चार चांद लावले आहेत. सोनू असा गायक आहे, ज्याने रोमँटिक ते दर्दभरी सर्व प्रकारची गाणी चाहत्यांसमोर सादर केली आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की, हा गायक करोडोच्या संपत्तीचा मालक देखील आहे.

चाहत्यांमध्ये सोनूची गाणी नेहमीच पसंत केली जातात. गाण्याबरोबरच सोनू अनेक शोमध्ये जज म्हणूनही काम करतो. त्याच्या नेटवर्थविषयी बोलायचे तर, 2021मध्ये सोनू निगमची निव्वळ संपत्ती 50 दशलक्ष डॉलर म्हणजे 370 कोटी भारतीय रुपये इतकी आहे.

सोनू निगम गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी सिनेसृष्टीत आपल्या गायनाची जादू पसरवत आहे. अशा स्थितीत त्याची कमाई देखील कोटींमध्ये झाली आहे. गायकाकडे अनेक कार्स आणि घरे आहेत. चला तर त्याच्या नेटवर्थवर एक नजर टाकूया…

सोनू निगमची संपत्ती

सोनू निगमची एकूण संपत्ती (2021) अंदाजे 50 मिलिअन डॉलर अर्थात 370 कोटी इतकी आहे. एवढेच नाही तर, गायकाची मासिक कमाई (Monthly Income) 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. सोनूची संपत्ती दरवर्षी वाढत आहे. सोनूकडे कमाईचे वेगवेगळी साधने आहेत. गाणी आणि लाईव्ह कार्यक्रम रेकॉर्ड करण्याव्यतिरिक्त, तो स्पॉन्सरशिपमधून देखील चांगली कमाई करत आहे.

सोनू निगमचे कार आणि बाईक कलेक्शन

सोनू निगमला लक्झरी कार आणि बाईक खूप आवडतात. त्याच्याकडे सर्वात महागडी रेंज रोव्हर कार आहे, ज्याची किंमत तब्बल 2.11 कोटी रुपये आहे. याशिवाय डीसी अवंती, ऑडी ए, रेंज रोव्हर वॉग, बीएमडब्ल्यू झेड4 या लक्झरी गाड्याही सोनूकडे आहेत.

सोनूचे घर

सोनू निगमने याआधीच यूट्यूबवरील ब्लॉगद्वारे चाहत्यांना त्याच्या घराची झलक दाखवली आहे. सोनू निगमचा बंगला अगदी विलासी आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, सोनू निगमकडे 25 कोटी रुपयांची आलिशान मालमत्ता आहे.

अभिनयातही आजमावले नशीब

गाण्याव्यतिरिक्त सोनूने अभिनयातही नशीब आजमावले आहे. सोनूने बर्‍याच चित्रपटांत भूमिका देखील केल्या, पण गाण्यातून मिळालेले यश तिथे मिळू शकले नाही. सोनू निगमने ‘लव्ह इन नेपाळ’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले. पण जेव्हा अभिनयात यश आले नाही, तेव्हा त्याने फक्त गाण्यावरच लक्ष केंद्रित केले.

(Bollywood Singer Sonu Nigam Net Worth)

हेही वाचा :

‘बडे अच्छे लगते हैं 2’ मालिकेत काम करण्यासाठी दिव्यांका त्रिपाठीचा नकार, म्हणाली…

कधी काळी लग्नसोहळ्यांमध्ये गाणी गायचा, ‘या’ शोमुळे सोनू निगमला मिळाली ओळख!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें