Divyanka Tripathi : ‘बडे अच्छे लगते हैं 2’ मालिकेत काम करण्यासाठी दिव्यांका त्रिपाठीचा नकार, म्हणाली…

दिव्यांका त्रिपाठीनं 'बडे अच्छे लगते हैं 2' ही मालिका करण्यास नकार दिला आहे. या शोमध्ये दिव्यांकाला मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. (Divyanka Tripathi refuses to work in 'Bade Achche Lagte Hain 2' serial, says ...)

Divyanka Tripathi : 'बडे अच्छे लगते हैं 2' मालिकेत काम करण्यासाठी दिव्यांका त्रिपाठीचा नकार, म्हणाली...
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jul 30, 2021 | 3:00 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही शो बडे अच्छे लगते हैं (Bade Achhe lagte hain), लवकरच दुसऱ्या सीझनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जिथे आता अशी बातमी समोर आली आहे की दिव्यांका त्रिपाठीनं (Divyanka Tripathi) ‘बडे अच्छे लगते हैं 2‘ (Bade Achhe lagte hain 2) ही मालिका करण्यास नकार दिला आहे. या शोमध्ये दिव्यांकाला मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. या शोसाठी ती निर्मात्यांशी अनेक दिवस चर्चा करत होती, मात्र आता अभिनेत्री म्हणते की ती या शोचा भाग नाही कारण ती शोच्या पात्राशी स्व:ताला जोडू शकलेली नाही. ती शोच्या व्यक्तिरेखेशी कनेक्ट होऊ शकली नाही त्यामुळे तिला शोला निरोप घ्यावा लागला.

दिव्यांका टीव्हीचा एक खूप मोठा चेहरा आहे,  प्रत्येकाला तिची स्टाईल आवडते. ती तिच्या पात्रांना अशा प्रकारे साकारते की प्रत्येकजण तिच्यासाठी वेडा होतो. नुकतंच दिव्यांका आणि तिचा नवरा विवेक दहिया सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी लाईव्ह आले होते, तिथं दिव्यांकाच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले होते, त्यादरम्यान तिनं सांगितले की ती आता बडे अच्छे लगते है 2 चा भाग नाही.

नकुल मेहता आणि दिव्यंकाची जोडी तुटली ‘बडे अच्छे लगते हैं 2’ मध्ये, दिव्यंकासोबत नकुल मेहता मुख्य भूमिकेत झळकणार होता. मात्र आता दिव्यांकानं हा शो करण्यास नकार दिला आहे. ज्याच्यामुळे आता या शोमध्ये दिव्यांकाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्री दिसणार.

दिव्यांकाला करण पटेलसोबत काम करायचं आहे या लाइव्ह दरम्यान, जेव्हा दिव्यांकाला विचारण्यात आलं की तिला तिच्या ये है मोहब्बतेंचा सह कलाकार करण पटेलसोबत काम करायला आवडेल का, तेव्हा अभिनेत्रीने उत्तर दिले, “का नाही?” मला त्याच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल, एक अभिनेता म्हणून त्याची आणि माझी केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. यामुळे मला त्याच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल.

खतरों के खिलाडी सीझन 11 सध्या दिव्यांका खतरों के खिलाडी सीझन 11 मध्ये दिसत आहे, नुकतंच दक्षिण आफ्रिकेत या शोच्या शूटिंगनंतर दिव्यांका भारतात परत आली. हा कार्यक्रम सध्या टीव्हीवर दाखवला जात आहे. या शोमध्ये अभिनेत्री अतिशय धमाकेदार शैलीत दिसत आहे, तिच्या चाहत्यांनाही ती पसंतीस उतरत आहे. या शो दरम्यान रोहित शेट्टी यांनी दिव्यांकाला विमानात चढून 10 झेंडे गोळा करण्यास सांगितलं. दिव्यंकानं या टास्कमध्ये खूप चांगली कामगिरी केली. (Divyanka Tripathi refuses to work in ‘Bade Achche Lagte Hain 2’ serial, says …)

संबंधित बातम्या

Bell Bottom Release Date | मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी अक्षय कुमार सज्ज, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘बेल बॉटम’!

Malaika Arora : अर्जुन कपूरच्या नव्या गाडीने मलायकाची विमानतळावर एण्ट्री, पाहा फोटो

Devmanus | ‘देवमाणूस’ मालिकेतून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट, जाणून घ्या मालिकेत पुढे काय होणार?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें