Bell Bottom Release Date | मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी अक्षय कुमार सज्ज, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘बेल बॉटम’!

अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' (Bell Bottom) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत होते आणि आता अखेर चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे.

Bell Bottom Release Date | मोठ्या पडद्यावर धमाका करण्यासाठी अक्षय कुमार सज्ज, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘बेल बॉटम’!
अक्षय कुमार
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 2:31 PM

मुंबई : अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. चाहते बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत होते आणि आता अखेर चित्रपटाची तारीख जाहीर झाली आहे. हा चित्रपट 19 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमारची (akshay kumar) जादू पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊननंतर अक्षयचा हा पहिला चित्रपट असेल, जो चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

या संबंधित घोषणा करताना अक्षयने लिहिले, ‘मिशन: मोठ्या पडद्यावर तुम्हा सर्वांचे मनोरंजन करण्याचे. तारीख: 19 ऑगस्ट 2021, बेल बॉटमची अनाउंसमेंट’

पाहा अक्षयची पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

रणजित तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. अक्षयचा हा चित्रपट गेल्या वर्षीपासून बराच चर्चेत होता, कारण हा असा पहिला चित्रपट होता, ज्याचे कोरोना दरम्यान शूटिंग पूर्ण झाले. तथापि, त्यावेळी सर्व खबरदारी घेण्यात आली होती.

अक्षयने डबल शिफ्टमध्ये काम केले!

जेव्हा अक्षय आणि चित्रपटाची टीम शुटींगसाठी परदेशात गेली, तेव्हा सर्वांना आधी क्वारंटाईन ठेवणे आवश्यक होते, ज्यामुळे चित्रपटाचे शूटिंग उशिरा सुरू झाले. निर्मात्यांना या नुकसानीपासून वाचवण्यासाठी अक्षयने चक्क डबल शिफ्टमध्ये काम केले आणि बाकीचे कामही पूर्ण केले. निर्मात्यांना त्रास होऊ नये, अशी अक्षयची इच्छा होती म्हणून त्याने सर्वांना डबल शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले. अक्षयने आपल्या कारकीर्दीत तब्बल 18 वर्षानंतर डबल शिफ्ट केली. अक्षयच्या या कामामुळे प्रत्येकजण खूप आनंदी होता आणि याच कारणामुळे चित्रपटाचे शूटिंग लवकर संपवून सगळे भारतात परत आले.

अक्षय व्यतिरिक्त हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, या चित्रपटाची निर्मिती वासू भगानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे. ‘बेल बॉटम’ची कथा एका वास्तविक घटनेवर आधारित आहे आणि आपल्याला चित्रपटाच्या कथेत 80च्या दशकाची झलक पाहायला मिळेल.

अक्षयकडे कामच काम!

‘बेल बॉटम’शिवाय अक्षय ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वीराज’, ‘राम सेतू’ आणि ‘बच्चन पांडे’ यांच्यासह आणखी बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. शेवटी अक्षय ओटीटीवर रिलीज झालेल्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अक्षयसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

(Bell Bottom Release Date announce Akshay Kumar Share post)

हेही वाचा :

Bigg Boss 15 | सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॉमेडीयन ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी होण्याची शक्यता!

Radhe Shyam | अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासचा ‘राधे श्याम’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.