Bigg Boss 15 | सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॉमेडीयन ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी होण्याची शक्यता!

टीव्हीचा बहुचर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा 15 वा सीझन (Bigg Boss 15) लवकरच सुरू होणार आहे. चाहते या शोबद्दल खूप उत्सुक आहेत. शोच्या स्पर्धकांमध्ये आतापर्यंत अनेक सेलेब्सची नावे समोर आली आहेत.

Bigg Boss 15 | सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, कॉमेडीयन ‘बिग बॉस 15’मध्ये सहभागी होण्याची शक्यता!
सुनील ग्रोवर

मुंबई : टीव्हीचा बहुचर्चित आणि वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा 15 वा सीझन (Bigg Boss 15) लवकरच सुरू होणार आहे. चाहते या शोबद्दल खूप उत्सुक आहेत. शोच्या स्पर्धकांमध्ये आतापर्यंत अनेक सेलेब्सची नावे समोर आली आहेत. पण आता, या यादीत जोडले जाणारे नाव जाणून चाहते देखील खूप उत्साहित होतील.

वास्तविक, अशा बातम्या समोर येत आहेत की, अभिनेता-कॉमेडीयन सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) यालाही या कार्यक्रमासाठी संपर्क साधण्यात आला आहे. पिंकविलाच्या अहवालानुसार निर्मात्यांना सुनील या कार्यक्रमाचा एक भाग व्हावा, अशी इच्छा असून त्याचे अभिनेत्याशी बोलणे सुरु आहे. तथापि, सुनील शोचा भाग असेल की, नाही हे अद्याप माहित नाही.

मात्र, जर सुनील या शोचा भाग बनला, तर प्रेक्षकांना नक्कीच भरपूर मनोरंजन मिळेल. कारण तो नेहमीच सर्वांना हसवत राहतो. आतापर्यंत सुनीलने ‘गुत्थी’, ‘डॉक्टर मशूर गुलाटी’ आणि ‘रिंकू देवी’च्या पात्रांमधून सर्वांना खूप हसवले आहे.

हर्षद चोप्राशीही साधला संपर्क

याआधी अशी बातमी आली होती की, अभिनेता हर्षद चोप्रा देखील या हंगामाचा एक भाग असेल. त्याला या शोची ऑफर देखील मिळाली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात शोच्या निर्मात्यांकडून कोणतेही विधान समोर आलेले नाही.

‘या’ नावांची स्पर्धक म्हणून चर्चा

बातमीनुसार अनुषा दांडेकर, दिशा वाकानी, मल्लिका शेरावत यांनाही या शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे. तसे, या हंगामात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी निर्माते एकापेक्षा एक सेलिब्रिटींकडे येत आहेत.

बिग बॉस ओटीटीचा प्रीमियर

यावेळी ‘बिग बॉस 15’ टीव्हीपूर्वी ओटीटीवर प्रीमियर होईल. सलमान खान ऐवजी करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करेल. करण पहिल्यांदा बिग बॉस होस्ट करणार आहे. अशा परिस्थितीत करण सलमानसारख्या प्रेक्षकांची मने जिंकू शकणार की, नाही याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात जाण्यापूर्वी स्पर्धक क्वारंटाईन

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी शोच्या स्पर्धकांना 8 ऑगस्टला बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळेल. पण, त्याआधी प्रत्येक स्पर्धकाला अलगीकरणात ठेवेल जाईल. अलीकडेच बिग बॉसच्या ओटीटी घराचा एक फोटो समोर आला आहे. मात्र, यामध्ये फक्त डायनिंग हॉल दाखवण्यात आला आहे.

(Bigg Boss 15 makers approached Actor Comedian Sunil Grover for upcoming season)

हेही वाचा :

कधी काळी लग्नसोहळ्यांमध्ये गाणी गायचा, ‘या’ शोमुळे सोनू निगमला मिळाली ओळख!

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ‘आपली यारी’, फ्रेंडशीप-डेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने रिलीज केलं नवं गाणं!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI