सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ‘आपली यारी’, फ्रेंडशीप-डेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने रिलीज केलं नवं गाणं!

आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमित्ताने  प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे ‘आपली यारी’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियाद्वारे रिलीज केले.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची ‘आपली यारी’, फ्रेंडशीप-डेच्या निमित्ताने प्रार्थना बेहेरेने रिलीज केलं नवं गाणं!
आपली यारी
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 30, 2021 | 12:18 PM

मुंबई : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि बॉलीव़ूड निर्माता निखील नमीत गेले दहा वर्षापासून जवळचे मित्र आहेत. सलमान खानची फिल्म ‘बॉडीगार्ड’मुळे प्रार्थना आणि निखीलची फ्रेंडशीप झाली. आपल्या मैत्रीच्या दशकपूर्ती निमीत्ताने  प्रार्थनाने निखील नमीतच्या नादखुळा म्युझिक लेबलचे ‘आपली यारी’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियाद्वारे रिलीज केले. फ्रेंडशीप-डेच्या मुहूर्तावर आलेल्या या गाण्यामध्ये पहिल्यांदाच दहा मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिसत आहेत.

आमच्या मैत्रीप्रमाणेच!

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणाली, “नादखुळा या निखीलच्या म्युझिक लेबलवर फ्रेंडशीप डे निमित्ताने आपली यारी हे गाणे लाँच होतंय. आणि ते मला लाँच करायची संधी मिळाली, याचा मला आनंद आहे. निखीलची आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. त्यामुळे आमच्या दोस्तीच्या दशकपूर्तीला फ्रेंडशीपवरचेच गाणे मी लाँच करावे, हा दुग्धशर्करा योग आहे.”

पाहा गाणं :

आमची यारी जगात लय भारी!

निर्माता निखील नमीत म्हणतात,”आपली यारी या गाण्याप्रमाणेच प्रार्थनाची आणि माझी मैत्री पक्की आणि ‘जगात लय भारी’ अशी आहे. त्यामुळेच तिने हे गाणे लाँच करणे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. महाराष्ट्रातल्या सध्याच्या पूरपरिस्थितीमुळे आम्ही या गाण्याचा रिलीजचा सोहळा रद्द करून ते पैसे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी देतोय.”

मराठी सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सची दोस्ती

‘आपली यारी’ गाण्याचे गीत-संगीत प्रशांत नाकतीने केले आहे. तर आदर्श शिंदे आणि सोनाली सोनावणेने हे गाणे गायले आहे. पहिल्यांदाच मराठीमध्ये निक शिंदे, श्रध्दा पवार, बॉब हातनोलकर, कोमल खरात, रितेश कांबळे, तृप्ती राणे, तन्मय पाटेकर, प्रतिभा जोशी, प्रथमेश देवळेकर, प्रतिक्षा थोरात हे दहा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स एका गाण्यासाठी एकत्र आले आहेत.

प्रशांत नाकती गाण्याविषयी सांगताना म्हणतो, “मराठी चित्रपटांमध्ये आपण दोस्तीवरची गाणी पाहिली आहेत. पण पहिल्यांदाच मराठीत म्युझिक लेबलचे मैत्रीवरचे गाणे आले आहे. मला पूर्ण विश्वास आहे, की, हे गाणे ऐकल्यावर, प्रत्येकाला आपल्या कॉलेजचे दिवस आणि, आपले जवळचे मित्र-मैत्रिण आठवतील. आम्ही दहा इन्फ्लुएन्सर्सवर हे गाणे चित्रीत केलंय. आणि मला अतिशय आनंद आहे की, या गाण्यामुळे त्या दहाजणांमध्येही एक घट्ट मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे.”

(Prarthana Behere released a new song Aapli Yaari on the occasion of Friendship Day)

हेही वाचा :

PHOTO | ‘हे आनंदाचे क्षण आयुष्यभर टिकून राहतील जर…’, सोशल मीडियावर दिसला राजेश्वरीचा चिलिंग मूड!

पहिल्याच चित्रपटातील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी चर्चेत, अंडरवर्ल्ड डॉनसोबतही जुळलेले सूर!  

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें