Radhe Shyam | अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासचा ‘राधे श्याम’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Harshada Bhirvandekar

Updated on: Jul 30, 2021 | 12:42 PM

अखेरीस तो दिवस उगवलाच ज्याची 'राधे श्याम' (Radhe shyam) आणि प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. पॅन-इंडिया स्टार प्रभासने (Prabhas) आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे.

Radhe Shyam | अखेर प्रतीक्षा संपली! प्रभासचा ‘राधे श्याम’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
राधे श्याम

मुंबई : अखेरीस तो दिवस उगवलाच ज्याची ‘राधे श्याम’ (Radhe shyam) आणि प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. पॅन-इंडिया स्टार प्रभासने (Prabhas) आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एक डेपर लूकमध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे कि, चित्रपट येत्या मकर संक्रांति/पोंगलला म्हणजेच 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल.

हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “Can’t wait for you all to watch my romantic saga, #RadheShyam, which has a brand new release date –  14th January, 2022 worldwide!”

पाहा पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत आणि या बातमीने प्रेक्षकांना अतिशय उत्साहित केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की, हा चित्रपट या वर्षीच्या सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असेल आणि प्रभासचे चाहते निश्चितच या घोषणेने आनंदित झाले आहेत.

या चित्रपटसोबत जवळपास दशकभराने प्रभास रोमांटिक शैलीत परतत असून, या चित्रपटामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. त्यामधून  प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.

प्रभासचा हा चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘राधे श्याम’ हा एक बहुभाषी चित्रपट असून, गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.

कॉस्ट्यूमवर कोट्यवधी रुपये खर्च

‘राधे-श्याम’ हा प्रभासच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात निर्माते प्रभासच्या वेशभूषावर जवळपास 6 कोटी खर्च करत आहेत. ज्यामुळे चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत.

आदिपुरुषमध्ये झळकणार प्रभास!

‘राधे श्याम’नंतर प्रभास ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत कृती सेनॉन आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात प्रभास ‘राम’, सैफ अली खान ‘रावण’ आणि कृती सेनन ‘सीता’ची भूमिका साकारताना दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी आदिपुरुषच्या सेटवर आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली आणि संपूर्ण क्रोमा सेट जळून खाक झाला होता. निर्मात्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला होता.

‘वॉर 2’मध्ये बनणार व्हिलन!

रिपोर्ट्सनुसार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ चित्रपटाचा दुसरा भाग बनवण्यात येणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात हृतिकच्या या चित्रपटात प्रभास व्हिलनच्या भूमिकेत दिसू शकतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात टायगर श्रॉफने व्हिलनची भूमिका साकारली होती. पण शेवटच्या भागात त्याचा मृत्यू दाखवण्यात आला होता.

(Prabhas most awaited film Radhe shyam release date announce)

हेही वाचा :

PHOTO | ‘हे आनंदाचे क्षण आयुष्यभर टिकून राहतील जर…’, सोशल मीडियावर दिसला राजेश्वरीचा चिलिंग मूड!

 पहिल्याच चित्रपटातील बोल्ड सीनमुळे मंदाकिनी चर्चेत, अंडरवर्ल्ड डॉनसोबतही जुळलेले सूर!  

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI