सोनू निगमने गायलं, हिरो-हिरोईनने जीव ओतला; तरी ‘हे’ भन्नाट रोमान्स असलेलं मराठी गाणं म्हणावं तसं गाजलंच नाही!

Marathi Movie Romantic Song : ४५ लाखांहून अधिक व्ह्यूज... आवाज सोनू निगमचा आणि पडद्यावर असा रोमँटिक अंदाज असा की नजर हटणार नाही. मराठी सिनेमातील या गाण्यात अभिनेता अभिनेत्रीची केमिस्ट्री पाहून तुम्हालाही हे गाणं आवडल्याशिवाय राहणार नाही.

सोनू निगमने गायलं, हिरो-हिरोईनने जीव ओतला; तरी ‘हे’ भन्नाट रोमान्स असलेलं मराठी गाणं म्हणावं तसं गाजलंच नाही!
Marathi Song News
Image Credit source: social media
| Updated on: Oct 06, 2026 | 3:32 PM

शशिकांत धोत्रे दिग्दर्शित सजणा हा सिनेमा रिलीज होऊन आता एक वर्ष उलटून गेलं आहे. या सिनेमात आकाश सर्वगोड याने सजणा हे पात्र साकारले आहे तर अभिनेत्री तृप्ती मोरे हिने वंदनाची भूमिका अगदी चोख निभावली आहे. या दोघांनीही आपल्या अभिनयाने अक्षरशः कमाल केली आहे. त्यांच्या याच नैसर्गिक अभिनयाला एका भन्नाट गाण्याची जोड मिळाली आहे. या एका विशिष्ट गाण्यात दोघांचा जो रोमान्स आणि केमिस्ट्री दाखवली आहे ती एकदम भारी आहे. मराठी सिनेमातल्या एखाद्या गाण्यात हिरो आणि हिरोईनचा असा अस्सल रोमान्स याआधी क्वचितच पाहायला मिळाला असेल. दोघांनीही आपल्या डोळ्यांतून आणि वावरण्यातून खऱ्या प्रेमाची जिवंत अनुभूती पडद्यावर अगदी हुबेहूब साकारली आहे.

याच भारी अभिनयाला एका जादुई आवाजाची साथ मिळाली आहे पण दुर्दैवाने अनेकांना ती अजून माहितीच नाही. सजणा या सिनेमाचे हे टायटल सॉन्ग सध्या यूट्यूबवर ४५ लाख व्ह्यूज घेऊन बसले आहे. चांगल्या गाण्यांना यापेक्षा अधिक व्ह्यूज मिळतात. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एवढं भारी गाणं अजूनही अनेक लोकांच्या पसंतीस उतरलेले नाही. या गाण्याला चक्क सोनू निगम यांनी आपला आवाज दिला असून ते मराठी प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा भुरळ घालत आहेत. त्यांच्या या मनाचा ठाव घेणाऱ्या आवाजाला राजेश्वरी पवारच्या सुमधुर स्वरांची एकदम कडक साथ मिळाली आहे. राजेश्वरीचा आवाज ऐकून अनेकजण तिचे तोंडभरून कौतुक करताना दिसतात.

Loading...

ओंकारस्वरूप बागडे यांनी या गाण्याला दिलेली चाल एकदम अफलातून आहे. सुहास मुंढे यांनी लिहिलेल्या शब्दांची जादूही हळूहळू वाढत जाते. सुरुवातीला साधे वाटू शकणारे बोल गाण्याच्या सुरांमध्ये आणि आकाश तसेच तृप्ती पडद्यावर साकारत असलेल्या प्रेमाच्या भावनेत हे अचूकपणे मिसळून जातात. या शब्दांमधील रांगडेपणाच या गाण्याची खरी ताकद ठरला आहे. ४५ लाख लोकांपर्यंत पोहोचलेले हे गाणे मराठी संगीतातला एक वेगळाच प्रयोग ठरले आहे आणि सोशल मीडियावर आपली हवा निर्माण करत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us