
कधी कोणाचे आयुष्य पलटेल हे सांगता येत नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार देखील असेच असतात. त्यांचा एखादा सिनेमा त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातो. सध्या एक अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे.

कयादु लोहारने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने काही मोजक्याच सिनेमांमध्ये काम केले असले तरी तिचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या सौंदर्याने या अभिनेत्रीने तरुणांच्या हृदयावर राज्य केले आहे.

सध्या कयादु लोहारचा एक फोटो चर्चेत आहे. ती एका चित्रपटासाठी जी.व्ही. प्रकाशसोबत बाथटबमध्ये बिना कपड्यांमध्ये दिसत आहे. 'इमॉर्टल' चित्रपटाचे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जी.व्ही. प्रकाशसोबत कयादुचा 'इमॉर्टल' चित्रपटाचे एक आकर्षक पोस्टर प्रदर्शित झाले आहे. बाथटबमध्ये हीरोसोबत कयादु दिसत आहेत. तिच्या हातात दारूने भरलेला ग्लास दिसत आहे. पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे.

कयादु लोहारचा जन्म 11 एप्रिल 2000 रोजी आसाममधील तेजपूर येथे झाला. तिने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 2021 मध्ये एव्हरीयूथ फ्रेश फेस सीझन 12 ची विजेती ठरली. त्याच वर्षी तिने कन्नड चित्रपट 'मुगिलपेट'मधून अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

तेलुगूमध्ये तिने 'अल्लूरी' चित्रपटात अभिनेता श्री विष्णुसोबत काम केले. पण तो चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली नाही. पण अलीकडेच तमिळमध्ये प्रदर्शित झालेल्या 'ड्रॅगन' चित्रपटात काम करून ती लोकप्रिय झाली आहे.

कयादु लोहार आता तरुणांची स्वप्नसुंदरी बनली आहे. सोशल मीडियावर तिचे प्रचंड चाहते आहेत. तिला 25 लाख युजर्स फॉलो करतात. ती नेहमीच आपले सुंदर फोटो पोस्ट करत असते.