AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली; ICU मध्ये दाखल, लग्नामुळे जोडी होती चर्चेत

आपल्या लग्नामुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेली प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री महालक्ष्मी आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. महालक्ष्मीचा पती रवींद्र चंद्रशेखर याची प्रकृती बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पुढील आठवडाभर त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू असतील.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली; ICU मध्ये दाखल, लग्नामुळे जोडी होती चर्चेत
South actress Mahalakshmi and her husbandImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 12, 2024 | 12:04 PM
Share

चेन्नई : 12 जानेवारी 2024 | दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली होती. प्रसिद्ध दाक्षिणात्य निर्माता रवींद्र चंद्रशेखरशी तिने लग्न केलं होतं. या लग्नाचे फोटो जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आता महालक्ष्मीच्या पतीच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. रवींद्रची तब्येत बिघडली असून त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याचं समजतंय. प्रसिद्ध निर्माता आणि लिब्रा प्रॉडक्शन्सचा मालक रवींद्र चंद्रशेखरला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याने त्याला रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी आयसीयूमध्ये दाखल केलं. रवींद्रच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पुढील आठवडाभर रवींद्र हे आयसीयूमध्येच डॉक्टरांच्या निगराणीखाली असतील, अशी माहिती समोर येत आहे.

महालक्ष्मीने रवींद्रशी दुसरं लग्न केलं. या लग्नाआधी तिचा घटस्फोट झाला होता. 2022 मध्ये तिने रवींद्रशी लग्न केलं. हे लग्न सोशल मीडियावर तुफान चर्चेत आलं होतं. कारण महालक्ष्मी आणि रवींद्रचे फोटो समोर येताच नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. ही जोडी एकमेकांच्या विरुद्ध असल्याची टिप्पणी काहींनी केली. तर महालक्ष्मीने फक्त पैसा बघून रवींद्रशी लग्न केलं, असंही काही युजर्सनी म्हटलं होतं.

महालक्ष्मी आणि रवींद्र यांची ओळख ‘विदियुम वरई काथिरु’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. चित्रपटात काम करताना दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. महालक्ष्मीबद्दल सांगायचं झालं, तर ती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. महालक्ष्मी तिच्या युट्यूब चॅनलवर बिग बॉस या शोचा रिव्ह्यूसुद्धा करते. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळते. तिने ‘ऑफिस’, ‘थिरु मंगलम’, ‘केलाडी कनमनी’, ‘यामिरुक्का बयामेन’, ‘अरसी’, ‘वाणी रानी’ आणि ‘चेल्लामय’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर रवींद्रने काही दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती केली आहे.

रवींद्रने 2013 मध्ये ‘सुट्टा कढाई’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर 2014 मध्ये ‘नालानुम नंदिनीयुम’, ‘कोलाई नोक्कू पारवई’ आणि 2017 मध्ये ‘कल्याणम’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.