प्रायव्हेट विमान, १०० कोटींचा भव्य बंगला… रॉयल आयुष्य जगते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

एक दोन नाही तर, 'या' अभिनेत्रीचे चार शहरांमध्ये भव्य घर, एक सिनेमासाठी घेते इतकं मानधन... वर्षाची कमाई जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे.

प्रायव्हेट विमान, १०० कोटींचा भव्य बंगला... रॉयल आयुष्य जगते ही प्रसिद्ध अभिनेत्री
| Updated on: Apr 14, 2023 | 12:47 PM

मुंबई : सेलिब्रिटी कायम त्यांच्या प्रोफेशल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, सेलिब्रिटींची संपत्ती त्यांची रॉयल लाईफ स्टाईल देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते. फक्त बॉलिवूड कलाकार नाही तर,दाक्षिणात्य सिनेविश्वातील सेलिब्रिटी देखील त्यांच्या महागड्या लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतात. कोट्यवधींची संपत्ती, भव्य बंगले, महागड्या गाड्या… इत्यादी गोष्टींमुळे झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम चर्चेत असतात. आता दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि अभिनेत्रीच्या कोट्यवधींच्या संपत्तीबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. नयनतारा दाक्षिणात्य सिनेविश्वातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीकडे प्रायव्हेट जेट, भव्य बंगला, महागड्या गाड्या तर आहेत, पण अभिनेत्री प्रचंड रॉयल आयुष्य जगते.

सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारात कोट्यवधी रुपये कमावणारी नयनतारा इतर माध्यमातून देखील बक्कळ पैसे कमावते. नयनतारा एका ब्रान्डसाठी तब्बल ५ कोटी रुपये मानधन घेते. नयनतारा के-ब्यूटी, टाटा स्काय या ब्रान्ड्ससोबत नयनतारा काम करते. नयनतारा कायम तिच्या कामामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

नयनताराचे चार शहरांमध्ये भव्य घर

अभिनेत्री नयनतारा हिचे चार भव्य घरं आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, नयनतारा हिचं हैदराबाद याठिकाणी १५ कोटी रुपयांचं घर आहे. चेन्नईमध्ये अभिनेत्रीचं ४ बीएचके घर आहे. अभिनेत्रीच्या चेन्नईतील घराची किंमत १०० कोटी रुपये आहे. केरळ आणि मुंबई याठिकाणी देखील नयनतारा हिचं आलिशान घर आहेत. त्या घरांची किंमत देखील कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.

फक्त आलिशान अनेक घरंच नाही तर, अभिनेत्रीकडे स्वतःचं प्रायव्हेट विमान देखील आहे. त्याच्या प्रायव्हेट जेटची किंमत देखील कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. शिवाय तिच्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे. अभिनेत्रीकडे बीएमडब्ल्यू कार आहे. या कारची किंमत जवळपास ७४.५० लाख रुपये आहे. अभिनेत्रीतडे मर्सिडीज कार आहे, जिची किंमत ८८ लाख रुपये आहे. शिवाय नयनतारा हिच्याकडे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, फोर्ड आणि बीएमडब्ल्यू ७ सीरिज देखील आहे.

नयनतारा फक्त अभिनेत्री नसून उद्योजक देखील आहे. नयनतारा एक इनव्हेस्टर आहे. तिने द लिप बाम कंपनी, चाय वाला आणि ऑयल कंपनीमध्ये गुंतवणूक केलं आहे. शिवाय अभिनेत्रीचे पती विग्नेश शिवन ‘राउडी पिक्चर्स बॅनर’ या प्रॉडक्शन हाऊसचे मालक आहेत. रिपोर्टनुसार अभिनेत्रीच्या नेट वर्थबद्दल सांगायचं झालं तर, तिची नेटवर्थ २२ मिलियन म्हणजे जवळपास १६५ कोटी आहे. नयनतारा एका सिनेमासाठी तब्बल १० कोटी रुपये घेते.