AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहच्या मालिकेत परत येतेय प्रेक्षकांची आवडती नायिका

या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्टार प्रवाहच्या नंबर वन मालिकेत या अभिनेत्रीने काम केलं होतं. आता लोकांच्या आग्रहास्तव ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

खास लोकाग्रहास्तव स्टार प्रवाहच्या मालिकेत परत येतेय प्रेक्षकांची आवडती नायिका
Girija PrabhuImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 19, 2025 | 9:44 AM
Share

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सुपरहिट मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधून घराघरात पोहोचलेल्या गौरीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. प्रेक्षकांची ही लाडकी नायिका खास लोकाग्रहास्तव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ या नव्याकोऱ्या मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.

‘कोण होतीस तू, काय झालीस तू!’ मालिकेतील कावेरी ही भूमिका साकारण्यासाठी गिरीजा प्रचंड उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना ती म्हणाली, “स्टार प्रवाह माझी लाडकी वाहिनी आहे. पुन्हा एकदा नवं पात्र साकारायची संधी दिल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनीचे आभार. कावेरी ही भूमिका खूप वेगळी आहे. मालिकेची गोष्ट कोकणात घडते त्यामुळे कोकणी भाषा शिकतेय. मालिकेच्या प्रोमोमध्ये छोटीशी झलक पाहायला मिळेलच. मालिकेत माझ्या वडिलांची भूमिका वैभव मांगले साकारत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मी कोकणी भाषेचे धडे गिरवत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

“कावेरीचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती नेहमी झटत असते. बाप-लेकीच्या नात्याचा घट्ट बंध या मालिकेत पाहायला मिळेल. गौरी आणि नित्या या दोन्ही व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे तेच प्रेम कावेरीलाही मिळेल अशी खात्री आहे,” असं ती पुढे म्हणाली.

स्टार प्रवाहने नुकतीच ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेची घोषणा केली. त्याचा दमदार प्रोमोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पहायला मिळतं की, कावेरीचे वडील, बहीण आणि भावोजी तिला शोधत असतात. कावेरी माडावर चढून नारळ काढत असते. तेवढ्यात तिचे वडील तिला तिच्या बहिणीला तिच्या सासूने परत सासरी बोलावल्याचं सांगतात. हे ऐकून कावेरी खुश होते आणि हे सगळं बहिणीच्या लहान मुलामुळे शक्य झाल्याचं म्हणते. पण त्याचसोबत लाडका भाचा दुरावणार म्हणून ती निराशसुद्धा होते. तेव्हा तिची बहीण तिला तिच्यासोबत मुंबईला यायला सांगते. “तू माझ्या बाळाची दुसरी आईच आहेस”, असं ती म्हणते. या मालिकेत गिरीजा प्रभू, वैभव मांगले, अमित खेडेकर आणि अमृता माळवदकर यांच्या भूमिका आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.