त्यांनी बळजबरीने किस..; अभिनेत्रीच्या आरोपांवर सुभाष घईंनी सोडलं मौन, म्हणाले, एखादं बाळ..
दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर अभिनेत्री नेहल वडोलियाने गंभीर आरोप केले आहेत. सुभाष घई यांनी बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नेहलने केला. या आरोपांवर आता घईंनी मौन सोडलं आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

‘कर्ज’, ‘कालीचरण’, ‘विधाता’, ‘मेरी जंग’, ‘राम लखन’, ‘सौदागर’, ‘खलनायक’, ‘परदेस’ आणि ‘ताल’सारखे सुपरहिट चित्रपट बनवून बॉक्स ऑफिसवर विशेष छाप सोडणारे निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई सध्या चर्चेत आहेत. अभिनेत्री नेहल वडोलियाने त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर आता घईंनी मौन सोडलं असून आपली बाजू मांडली आहे. नेहल वडोलियाने ‘हाऊस अरेस्ट’, ‘गंदी बात 3’ आणि ‘जुली’ यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. सुभाष घई यांनी मला एका हॉटेलच्या रुममध्ये बोलावून किस करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नेहाने केलाय.
सुभाष घई यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांच्या घराच्या गार्डनचा एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जर एखादं मूल तुमच्याकडे मदतीसाठी आलं, तर त्यांच्या व्यावसायिक प्रवासात त्यांना मदत करणं आणि मार्गदर्शन करणं हे एका वरिष्ठाचं कर्तव्य असतं. परंतु आजकाल प्रसिद्धीसाठी खऱ्या किंवा खोट्या विधानांसह सोशल मीडियावर झळकू इच्छिणाऱ्या अनोळखी लोकांना भेटणं भीतीदायक आहे. आजकाल मी जे काही ऐकतोय, त्यावरून इतकंच म्हणेन की देव त्यांना आशीर्वाद देवो. आदरपूर्वक करिअर घडवण्यासाठी एकमेकांचा सन्मान करणं गरजेचं असतं.’
सुभाष घई यांची पोस्ट-
View this post on Instagram
‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत नेहलने सांगितलं, “मी माझ्या मॅनेजरला डेट करत होती. एकेदिवशी तो मला सुभाष घईंच्या भेटीला घेऊन गेला होता. आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो होतो आणि तिथे दोन रुम्स होते. त्यातील एका रुममध्ये काही लोक मद्यपान करत होते. तेव्हा सुभाष घई मला म्हणाले की, चल मी तुला बाल्कनी दाखवतो. इथून संपूर्ण शहर कसं दिसतं, ते दाखवतो. मी बाल्कनीतून बाहेर पाहत होते, तेव्हा ते माझ्याकडे एकदम जवळून पाहत उभे होते. मग ते मला म्हणू लागले की, तुझं हास्य खूप सुंदर आहे. तू बॉलिवूडमध्ये खूप काही करू शकतेस. तुझं खूप मोठं नाव होईल. तू खूप सेक्सी आहेस, असं बडबडू लागले.”
“त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मी दुसऱ्या रुममधील वॉशरुममध्ये गेली. तेव्हा तिथेसुद्धा ते माझ्या मागेमागे आले. ते माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते. ते मला किस करण्यासाठी जवळ येत होते. मी घाबरून तोंड वळवलं तर त्यांनी माझ्या गालावर किस केलं”, असा धक्कादायक अनुभव नेहलने सांगितला. सुभाष घई यांच्यावर असे आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर काही अभिनेत्रींनी गंभीर आरोप केले होते.
