Birth Anniversary | कधी नाकारले बडे कलाकार, तर कधी मानाचे पुरस्कार, वाचा अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्याबद्दल…

| Updated on: Apr 06, 2021 | 10:39 AM

प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्म 6 एप्रिल 1931 रोजी झाला होता. चित्रपट क्षेत्र सोडल्यानंतर अभिनेत्रीने स्वत:ला सामाजिक जगापासून देखील पूर्णपणे वेगळे केले.

Birth Anniversary | कधी नाकारले बडे कलाकार, तर कधी मानाचे पुरस्कार, वाचा अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्याबद्दल...
सुचित्रा सेन
Follow us on

मुंबई :  आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री सुचित्रा सेन (Suchitra Sen) यांना कोण ओळखत नाही?… आज सुचित्रा सेन यांची जयंती आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा जन्म 6 एप्रिल 1931 रोजी झाला होता. चित्रपट क्षेत्र सोडल्यानंतर अभिनेत्रीने स्वत:ला सामाजिक जगापासून देखील पूर्णपणे वेगळे केले. सुचित्रा सेन बद्दल असे म्हटले जाते की, त्या एक अत्यंत स्वाभिमानी अभिनेत्री होत्या. ‘आंधी’, ‘देवदास’सारख्या चित्रपटांमध्ये स्वतःच्या अनोख्या अभिनय शैलीची छाप सोडून सुचित्रा यांनी सर्वांना वेड लावले होते. चला तर, आजच्या या खास दिवशी या अभिनेत्रीच्या जीवनातील काही खास गोष्टी जाणून घेऊया…(Suchitra Sen Birth Anniversary special story know about her career)

मोठमोठ्या नायकांना नकार!

सुचित्रा अशा अभिनेत्री होत्या ज्यांनी अनेक बड्या नायकांचे आणि निर्मात्यांचे चित्रपट नाकारले. इतकेच नाही तर, एकदा त्यांनी चक्क राज कपूर यांच्या चित्रपटाची ऑफरही नाकारली होती. सुचित्रा यांच्या नकाराचे कारण ठरली फुलं. कारण राज कपूर यांनी सुचित्रांना चक्क वाकून फुलं दिली होती. त्यांचा हा अंदाज सुचित्रा यांना आवडला नाही. इतकेच नाही तर, दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित राय यांना ‘देवी चौधुरानी’मध्ये सुचित्रा यांना कास्ट करायचे होते, पण त्यांनाही सुचित्रा यांनी नकार दिला नकार दिला होता.

मनोरंजन विश्व सोडल्यानंतर पुन्हा मागे वळून पहिले नाही!

1947 मध्ये, सुचित्रा सेन यांनी दिबानाथ सेन यांच्याशी लग्न केले आणि लग्नाच्या 5 वर्षानंतर, अभिनेत्रीने पुन्हा चित्रपटात पाऊल ठेवले आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा भरारी घेतली. 1978मध्ये ‘प्रणोय पाश’ या चित्रपटानंतर अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला आणि चित्रपट जगताला कायमचा निरोप दिला. असे म्हटले जाते की, चित्रपट विश्व सोडल्यानंतर त्या कधीही पुन्हा चर्चेत दिसल्या नाहीत (Suchitra Sen Birth Anniversary special story know about her career).

दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला!

बॉलिवूडचा सर्वात मोठा मान म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार, जो मिळवणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. अनेक दिग्गज कलाकार अद्यापही या मानाच्या प्रतीक्षेत आहेत. पण, 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्काराचा प्रस्ताव सुचित्रा सेन यांनी नाकारला होता. कारण त्यासाठी त्यांना कोलकाता सोडून दिल्लीला जावे लागणार होते. तसेच, पुन्हा सार्वजनिक ठिकाणी दिसणार नाही, असे स्वतःला दिलेले वचन त्यांना कोणत्याही स्थितीत मोडायचे नव्हते.

हिट चित्रपटांची राणी!

उत्तम कुमार आणि सुचित्रा सेनची जोडी बंगाली चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध जोडी होती. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘अग्निपरीक्षा’, ‘शाप मोचन’, ‘इंद्राणी’, ‘सप्तपदी’ या सारख्या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. 1953 ते 1978 दरम्यान सुचित्रा यांनी हिंदी आणि बंगालीमध्ये जवळपास 61 चित्रपट केले.

अभिनेत्रीला शासकीय इतमामात निरोप

पद्मश्री सुचित्रा यांचे 17 जानेवारी 2014 रोजी निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच दु:ख झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांना तोफेची सलामी देण्यात आली.

(Suchitra Sen Birth Anniversary special story know about her career)

हेही वाचा :

रेखाला पाहून सासूने आशीर्वाद नाही तर उगारली होती चप्पल, वाचा विनोद मेहरा-रेखाची लव्हस्टोरी…

The Intern | ऋषी कपूरच्या जागी अमिताभ बच्चन यांची वर्णी, दीपिकासोबत पुन्हा एकदा दिसणार बिग बी!