
मुंबई : मलयालम दिग्दर्शक आणि लेखक नारानीपुझा शनावास यांचे निधन झाले आहे. नारानीपुझा यांचे कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते जिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 37 वयाचे होते, त्याच्या आगामी ‘गांधीराजन’या चित्रपटाचे ते शूटिंग करत होते. त्याचवेळी नारानीपुझाला ह्रदयाचा झटका आला, त्यानंतर तातडीने त्यांना केजी रुग्णालयात दाखल केले जिथे असे सांगण्यात आले की, त्याच्या मेंदूने काम करणे थांबले आहे. त्यानंतर ते व्हेंटिलेटर होते. तब्येतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांना कोची येथील अॅस्टर मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आणि जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (sufiyum sujathayum’s film director died)
नारानीपुझा यांच्या निधनाबद्दल ऐकल्यानंतर चित्रपटसृष्टीला हादरा बसला आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरीने एक फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने लिहिले की, तुम्ही तुमच्या चित्रपटातील कथांप्रमाणे दयाळू आणि संवेदनशील होता. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो द्या, शनावास सर, मला आशा आहे की, आपल्या सूफी आत्म्याला सुंदर सुफियम सुजातायमसारखी सुंदर जागा मिळेल. पण तुम्ही खूपच लवकर गेले.
चित्रपट निर्माते विजय बाबू यांनीही सोशल मीडियावर दुख व्यक्त केले आहे. त्यांनी मलयालम पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, तु खूप साऱ्या आठवणी आणि कथा आमच्यासाठी सोडून गेला आहेस. नारानीपुझा शानावासचा शेवटचा चित्रपट सुफियम सुजातायम होता. जुलैमध्ये अॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आदित्य राव हैदरी, जयसूर्या आणि देव मोहन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या :
Thalaivi | ‘थलायवी’ चित्रपटातील अरविंद स्वामीच्या लूकची जोरदार चर्चा!
Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली
(sufiyum sujathayum’s film director died)