AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..; विद्यार्थ्यांसाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज

कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर विविध कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत. मुंबईतल्या एका आंदोलनात अभिनेत्री वनिता खरात सहभागी झाली होती.

प्रश्न विचारला की महाराष्ट्राचा अपमान..; विद्यार्थ्यांसाठी मराठी कलाकारांनी उठवला आवाज
वनिता खरात, सुमित राघवन, प्राजक्ता माळीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 24, 2026 | 11:26 AM
Share

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली देशातील असंख्य विद्यार्थी आणि तरुण आंदोलन करत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणापासून सुरू झालेलं हे आंदोलन आता देशभरात पेटलं आहे. मुंबईतही ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. या आंदोलनावर आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुमित राघवन, अमेय वाघ, प्राजक्ता माळी, वनिता खरात यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित, व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे.

काय म्हणाला सुमित राघवन?

“प्रश्न विचारू नका. जे चाललंय ते ठीक चाललंय. प्रश्न विचारल्याने देशाचा अपमान होतो. महाराष्ट्रात तर तुम्ही पाहिलंच असेल की सवाल केला तर महाराष्ट्राचा अपमान होतो. मग भले कोणी लोकप्रतिनिधी आणि त्याचे गुंड मिळून डॉक्टरांना निर्दयपणे मारू दे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही ना? पुल कोसळत आहेत, 2005 मध्ये पूर आला होता आणि आज 2026 आहे.. 21 वर्षांनंतरही परिस्थिती तशीच आहे. नालासोपारा, वसई-विरार भागात तीन-तीन दिवस वीज नसते. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत नाही. प्रश्न विचारला तर लाठ्यांचा मार मिळतो. हे सर्व काय चाललंय. याला लोकशाही म्हणायचं की हुकूमशाही,” असा सवाल सुमितने केला आहे.

याविषयी तो पुढे म्हणाला, “त्या विद्यार्थ्याची काय चूक आहे? ही गोष्ट स्मार्ट पद्धतीने हाताळता आली नसती का? जेव्हा तुम्हाला अंदाज येतो की असं काही घडणार आहे, तेव्हाच संवाद का साधला गेला नाही. हे इतकं कठीण आहे का? त्या मुलांना कसं मारलं गेलंय? ही मुलं आपल्या देशातलीच आहेत ना? तुम्हीसुद्धा या देशाचेच आहात ना? काय बोलावं हेच मला कळत नाहीये? महाराष्ट्रातील एक नेते म्हणतायत की, ही लोकं दहशतवादी आहेत. आम्ही दहशतवादी आहोत का, ही मुलं दहशतवादी आहेत का? हीच मुलं या देशाचे भविष्य आहेत. कृपया खुर्त्यांवरून उठा, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांच्या खांद्यावर हात ठेवा, त्यांचा विश्वास जिंका. तुम्ही ज्येष्ठ व्यक्ती आहात, कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याप्रमाणे आहात. त्यामुळे त्यांच्याशी बोला. मी त्या आंदोलक मुला-मुलींना सलाम करतो.”

प्राजक्ता माळीची पोस्ट-

‘आतापर्यंत मी दोन गोष्टींवर विश्वास ठेवलाय.. संवाद आणि शांती. कोणताही वाद निष्पक्ष चर्चेद्वारे सोडवला जाऊ शकतो आणि प्रत्येक व्यक्ती शांती आणि शांततापूर्ण वातावरणासाठी पात्र असतो. संवाद साधा आणि शांती निवडा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेदनेसाठी माझं मन दुखावतंय’, अशा शब्दांत अभिनेत्री प्राजक्ता माळी व्यक्त झाली.

वनिता खरातने आंदोलनात दाखवलं संविधान

‘काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानाने आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या, प्रश्न विचारा, न्यायाची साथ द्या,’ अशी पोस्ट अभिनेत्री वनिता खरातने लिहिली आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच