इंधन दरवाढीवर सुनील शेट्टीचा हटके जुगाड, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, ‘पेट्रोल का सीन टाइट…’

इंधन दरवाढीची झळ सेलिब्रिटींना सुद्धा... पेट्रोलच्या किंमती वाढल्यानंतर सुनील शेट्टीचा हटके जुगाड, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला, 'पेट्रोल का सीन टाइट...'

इंधन दरवाढीवर सुनील शेट्टीचा हटके जुगाड, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, पेट्रोल का सीन टाइट...
Suniel Shetty
| Updated on: May 21, 2026 | 8:20 AM

Suniel Shetty Petrol Price Hike: देशात इंधनांच्या दरात दिवसागणिक वाढच होत आहे. एवढंच नाही तर, पेट्रोल – डिझेल मिळणं देखील कठीण झालं आहे. अनेक ठिकाणी तर, पेट्रोल पंपच बंद आहेत. देशात सर्वत्र फक्त आणि फक्त वाढत असलेल्या महागाईची चर्चा असताना अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्याच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सांगायचं झालं तर, सुनील शेट्टी यांनी आगामी सिनेमा ‘वेलकम टू जंगल’ सिनेमातील एक सीन शेअर केला आहे. ज्यामध्ये सुनील शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमार घोडेस्वारी करताना दिसत आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने विनोदी कॅप्शन दिलं आहे. व्हिडीओ चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

सुनील शेट्टी यांनी पोस्ट केला ‘वेलकम टू जंगल’ सिनेमातील एक सीन

‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातील टायटल सॉन्ग सोमवारी प्रदर्शित झाला आहे. त्यानंतर अभिनेत्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार त्यांच्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमातील एका सीनमध्ये घोडेस्वारी करताना दिसत आहे.

 

व्हिडीओ पोस्ट करत सुनील शेट्टी कॅप्शनमध्ये म्हणाले, ‘पेट्रोल का सीन टाईट है… म्हणून घोडेस्वारी करत आहोत… एक जबरदस्त प्रवासाची सुरुवात होणार आहे… 26 जून 2026…’, या पोस्टवर नेटकरी देखील विनोदी कमेंट करत आहे. सध्या अभिनेत्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. इंधन दर वाढले आहेत कारण, पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. याच कारणामुळे, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 15 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार स्टारर ‘वेलकम टू द जंगल’

सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार स्टारर ‘वेलकम टू द जंगल’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमा 26 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अहमद खान यांच्या खांद्यावर आहे. तर सिनेमात सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्यासोबतच संजय दत्त, परेश रावल, रवीना टंडन, श्रेयस तळपदे, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, राजपाल यादव, दिशा पाटनी, जॉनी लीवर, तुषार कपूर, अरशद वारसी यांसारखे सेलिब्रिटी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Follow Us