Govinda: गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांमुळे पत्नी दुरावली पण कुटुंबात घडली चांगली गोष्ट, पहिल्यांदाच सगळे..

रक्षाबंधनानंतर टीना आहुजाने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहते आनंदले आहेत. अनेक वर्षांपासूनचा सुनीता आहुजा आणि भाचे कृष्णा अभिषेक-आरती सिंग यांच्यातील कौटुंबिक वाद मिटला असून, ते सर्वजण एकत्र राखी सेलिब्रेट करताना दिसले. मात्र, या सेलिब्रेशनमधून गोविंदा अनुपस्थित राहिल्याने त्याच्या कौटुंबिक संबंधांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Govinda: गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांमुळे पत्नी दुरावली पण कुटुंबात घडली चांगली गोष्ट, पहिल्यांदाच सगळे..
Govinda Family
| Updated on: Aug 31, 2026 | 3:25 PM

Sunita and Krushna : अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यातील मतभेद काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेत. त्याच्या कथित अफेअरच्या चर्चाही जोर धरू लागल्या, त्यावरून सुनीता यांनी बरीच टीकाही केली. मात्र आता आहुजा कुटुंबात एक चांगली गोष्ट घडली आहे.   रक्षाबंधनाचा सण होऊन तीन दिवस उलटून गेले, पण आता फिल्म इंडस्ट्रीमधून असा एका फोटो समोर आलाय, ज्यामुळे चाहते चांगलेच खुश झालेत. गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा यांची लेक टीनाने रक्षाबंधनाच्या खास सेलिब्रेशनचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेत. राखीपौर्णिमा झाल्यानंतर जरी हे फोटो तिने टाकले असले तरी, त्या फोटोतील सगळे हसरे चेहरे पाहून चाहतेही आनंदलेत.

मात्र या फोटोत एक चेहरा कमी दिसल्याने चाहते चिंतेतही पडले. कारण अभिनेता गोविंदा या सेलिब्रेशनमध्ये कुठेच दिसला नाही. असं असलं तरी दुसरीकडे सुनीता आहुजा ही तिचा भाचा कृष्णा अभिषेक आणि भाची आरती यांच्यासह दिसल्याने चाहत्यांच्याही चेहऱ्यावर हसू न आलं तरंच नवल. वाद मिटल्यानंतर हे संपूर्ण कुटुंब पहिल्यांदाच एकत्र दिसलं असून यावर चाहत्यांनीही लाईक्सचा वर्षाव केलाय.

टीनाने शेअर केले फोटो

गोविंदाची लाडकी लेक टीना आहुजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओमध्ये ती, भाऊ यशवर्धन आहुजा तसेच कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह या भावंडासह रक्षाबंधन सेलिब्रेट करताना दिसली. “आमचं राखी सेलिब्रेशन! ” अशी खास कॅप्शनही तिने या फोटोंसोबत लिहीली. भाचा कृष्णा आणि भाची आरती यांच्यासोबतचं सुनीता आहुजाचं नातं आता सुधारल्याचं या फोटोतून स्पष्ट दिसून आलं. पण या फोटोंमध्ये अभिनेता गोविंदा कुठेच दिसला नाही, त्यामुळे त्याच्या कौटुंबिक नात्यांबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं.

 

 

सेलिब्रेशनमधून गोविंदा गायब

एकीकडे संपूर्ण आुहजा कुटुंबाने एकत्र येऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. तर दुसरीकडे या सेलिब्रशनमध्ये अभिनेता गोविंदा मात्र कुठेही दिसला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यात गेल्या काही काळापासून मतभेद सुरू आहेत. काही काळापूर्वी दोघांमध्ये सोशल मीडियावर ‘कोल्ड वॉर’ही पाहायला मिळालं होत. सुनीता यांनी गोविंदाच्या आगामी चित्रपटातील अभिनेत्रीबाबत प्रश्न उपस्थित करत काही टिपण्णीही केली होती. त्यावर गोविंदानेही, तिला मर्यादेत राहून बोलायला हवं, असं सुनावलं होतं. आता या वादामुळेच गोविंदा हा आपल्या घरातील या राखी सेलिब्रेशनपासून दूर राहिला, असं काही सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच सुनीत आहुजा यांनी गोविंदाविरोधातील घटस्फोटाची याचिका मागे घेतली होती. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर गोविंदाच्या वतीने एक सार्वजनिक नोटीसही जारी करण्यात आली, ज्यामध्ये मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सना इशारा देण्यात आला.

अनेक वर्षांनी मिटले मतभेद

कृष्णा अभिषेक आणि सुनीता आहूजा यांच्यात जवळपास 14 वर्षांनी पॅच-अप झालंय. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात मतभेद झाले होते, आणि वेल जसा पुढे गेला, तशी त्यांच्यातली दरी आणखीनच वाढत गेली. मात्र एप्रिल 2026 मध्ये ‘लाफ्टर शेफ्स’ या रिॲलिटी शोच्या सेटवर सुनीता आहुजा अचानक पोहोचली, तिथे तिथ कृष्णा अभिषेक आणि काश्मीरा शाहची भेट घेतली होती. आता राखीच्या सेलिब्रेशननिमित्त ते सगळे एकत्र दिसल्याने चाहते आनंदलेत.

Follow Us