Gadar 2 | प्रदर्शनाच्या आधीच व्हायरल झाला ‘गदर 2’चा ॲक्शन सीन; हँडपंप नाही तर यावेळी पोलच तोडला

'गदर' चित्रपटातील हँडपंप उखडून काढण्याचा सीन चांगलाच व्हायरल झाला होता. आता सीक्वेलमध्ये तो पोल तोडताना दिसणार आहे. लीक झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Gadar 2 | प्रदर्शनाच्या आधीच व्हायरल झाला गदर 2चा ॲक्शन सीन; हँडपंप नाही तर यावेळी पोलच तोडला
Gadar 2
Image Credit source: Twitter
| Updated on: Feb 03, 2023 | 7:26 PM

मुंबई: सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीक्वेलमध्ये सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंग आणि अमिषा सकिनाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पार पडलं. ‘गदर 2’मधील एक ॲक्शन सीन नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये सनी देओल जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. ‘गदर’ चित्रपटातील हँडपंप उखडून काढण्याचा सीन चांगलाच व्हायरल झाला होता. आता सीक्वेलमध्ये तो पोल तोडताना दिसणार आहे. लीक झालेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या व्हिडीओमध्ये सनी देओल आणि अभिनेत्री सिमरत कौरला एका खांबाला बांधलं गेल्याचं पहायला मिळतंय. या दोघांना सैनिकांनी घेरलंय आणि त्यांच्यावर बंदूक रोखून धरली आहे. रागाच्या भरात सनी यावेळी त्याला बांधलेला खांबच तोडतो आणि स्वत:ला मुक्त करतो.

प्रजासत्ताक दिनी गदर 2 चा नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘हिंदुस्तान जिंदाबाद है.. जिंदाबाद था.. और जिंदाबाद रहेगा’ असं कॅप्शन देत सनीने हा पोस्टर शेअर केला होता. हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ हा ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वेल आहे. या चित्रपटात अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मासुद्धा भूमिका साकारणार आहे. उत्कर्ष यामध्ये सनी आणि अमिषाच्या मुलाची भूमिका साकारणार आहे.

21 वर्षांपूर्वी जेव्हा थिएटरमध्ये ‘गदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांमध्ये फक्त तारा सिंग आणि सकीना यांच्या प्रेमकहाणीचीच चर्चा होती. आता पुन्हा एकदा या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्य आहे. ‘गदर 2’ची कथा ही 1970 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धाच्या अवतीभोवती फिरते. यामध्ये सनी देओलचा मुलगा ‘जीते’ म्हणजेच उत्कर्ष शर्मा हा एका सैनिकाच्या रुपात दिसणार आहे.