AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघं एकाच व्हॅनिटी व्हॅनमध्ये, मी दार उघडणार इतक्यात..; सनी देओल-डिंपल कपाडियाबद्दल नवा खुलासा

सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची एकेकाळी इंडस्ट्रीत खूप चर्चा होती. ऐंशीच्या दशकात या जोडीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता एका ज्येष्ठ पत्रकाराने त्यांच्याविषयी नवीन दावा केला आह.

दोघं एकाच व्हॅनिटी व्हॅनमध्ये, मी दार उघडणार इतक्यात..; सनी देओल-डिंपल कपाडियाबद्दल नवा खुलासा
Sunny Deol and Dimple KapadiaImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2026 | 1:01 PM
Share

बॉलिवूडमध्ये एकेकाळी अभिनेता सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा होती. या दोघांनी एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री तर चाहत्यांना खूप आवडायची. पण त्याचसोबत त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा सेटवर चर्चेचा विषय बनायची. चित्रपटात काम करता करता दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यावेळी सनी विवाहित होता. सनी आणि डिंपल यांनी त्यांचं नातं कधीच उघडपणे मान्य केलं नसलं तरी वेळोवेळी अनेक दावे समोर आले आहेत. आता ज्येष्ठ सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी त्यांच्या कथित रिलेशनशिपबद्दल एक किस्सा सांगत जुन्या गॉसिपला पुन्हा एकदा हवा दिली आहे.

व्हॅनिटी व्हॅनचा किस्सा

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत ज्योती व्यंकटेश यांनी असा दावा केला आहे की, इंडस्ट्रीत असे अनेक रिलेशनशिप्स आहेत, जे सर्वांना माहीत असतात, पण त्यावर उघडपणे चर्चा केली जात नाही. याविषयी त्यांनी पुढे सांगितलं की, एकदा त्या सनी देओलची मुलाखत घेण्यासाठी कमलिस्तान स्टुडिओमध्ये गेल्या होत्या. ते व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडणार इतक्यात सनीच्या असिस्टंटने त्यांना थांबवलं. त्यानंतर ज्योती यांनी जवळपास अर्धा तास प्रतीक्षा केली. तेव्हा सनी देओल व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर आला आणि त्यांची माफी मागून सांगितलं की, त्यांना आणखी थोडा वेळ थांबावं लागेल. सनीने थांबायला सांगितल्यानंतर बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही. तेव्हा ज्योती यांनी डिंपल कपाडिया यांना त्याच व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येताना पाहिलं होतं.

“डिंपल माझ्याकडे पाहून हसली आणि मला हाय-हॅलो बोलून तिथून निघून गेली. त्यानंतर सनीने मला आत मुलाखतीसाठी बोलावलं. जेव्हा मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेले, तेव्हा सनीने मला सांगितलं की, तो एका प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होता, म्हणून त्याला वेळ लागला. मला सुरुवातीला असंच वाटलं होतं की दोघं कदाचित एखाद्या चित्रपटाची तयारी करत असतील. मात्र जेव्हा अशा कोणत्याही चित्रपटाची घोषणा झाली नाही, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, त्या दोघांमधील संबंध फक्त प्रोफेशनल नाही, तर त्यापेक्षा अधिक होतं. मी ऐकलेल्या अफवा खऱ्या होत्या”, असं ते पुढे म्हणाले.

लंडनमधील सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. या फोटोमध्ये दोघं रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकावर बसलेले दिसले. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला होता. मात्र सनी देओल आणि डिंपल यांनी त्यांच्या नात्याला कधीच जाहीरपणे दुजोरा दिलेला नाही.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा