Sunny Leone : सनी लिओनी अडचणीत?, अभिनेत्री आता CIDच्या रडारवर, नेमकं काय घडलं ?

अभिनेत्री सनी लिओनी हिला फसवणुकीच्या एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आली आहे. ती सीआयडीच्या रडारवर आली असून तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काय आहे प्रकरण, ते सविस्तर जाणून घेऊया..

Sunny Leone : सनी लिओनी अडचणीत?, अभिनेत्री आता CIDच्या रडारवर, नेमकं काय घडलं ?
अभिनेत्री सनी लिओनी
| Updated on: Jun 11, 2026 | 11:59 AM

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. एका कथित फसवणुकीच्या प्रकरणात ही अभिनेत्री सीआयडीच्या (CID) रडारवर आली आहे. कर्नाटकातील ‘शिवम असोसिएट्स’ या कंपनीशी संबंधित 2400 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याच्या तपासादरम्यान तिचं नाव समोर आलं आहं. मात्र, तिला नोटीस पाठवण्यात आली याचा अर्थ तिने कोणताही गुन्हा केला असा होत नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं.

गुन्हे अन्वेषण विभागाकडून (CID) या घोटाळ्यातील मुख्य आरोपीशी संबंधित प्रकल्पांच्या आर्थिक व्यवहारांबाबतच माहिती गोळा केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘शिवम असोसिएटस्’ आणि त्याचे प्रवर्तक शिवानंद नीलन्नवर यांच्यावर कथित बेकायदेशीर ठेव व गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून सुमारे 4.07 लाख गुंतवणूकदारांकडून निधी उभारल्याचा आरोप आहे. सीआयडी सध्या या संपूर्ण नेटवर्कचा आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा तपास करत आहे.

सनी लियोनीकडून मागितली माहिती

याच संदर्भात, एजन्सीने सनी लिओन हिच्याकडूनही माहिती मागवली आहे. 2023 साली प्रदर्शित झालेल्या ‘चॅम्पियन’ या कन्नड चित्रपटातील ‘डिंगारा बिल्ल्ली नानू’ (Dingara Billi Nanu) या गाण्यात सनी लिओनीने विशेष भूमिका (special appearance) साकारली होती. या चित्रपटाची निर्मिती शिवानंद नीलन्नवर यांनी केली होती, असे समजते. तपास अधिकाऱ्यांच्या मते, या गाण्यात परफॉर्म करण्यासाठी सनी लिओनीला सुमारे 1 कोटी रुपये देण्यात आले होते. या चित्रपटाचा आणि त्याच्याशी संबंधित देयकांचा स्रोत कुठला, तसेच आर्थिक व्यवहार ज्या पद्धतीने पार पडले, त्याबाबत सीआयडी (CID) आता माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

सनी लिओनीच्या चित्रपटाबद्दल वाद काय ?

मात्र, सनी लिओनी हिला केवळ माहिती मिळवण्याच्या उद्देशानेच ही नोटीस पाठवण्यात आली होती आणि सध्या तिच्यावर फसवणुकीचा कोणताही आरोप नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. कथित गुंतवणूक घोटाळ्याशी संबंधित असू शकणाऱ्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यावर या संस्थेचा सध्या फोकस आहे.

Follow Us