सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, मन हेलावणारा व्हिडीओ समोर, बहीण म्हणाली, ‘तुझा मृत्यू एक रहस्य आणि…’

Sushant Singh Rajput Death Anniversary : 'तुझा मृत्यू एक रहस्य आणि...', मृत्यूच्या 4 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूत याचा मन हेलावणारा व्हीडिओ समोर... आजच अभिनेत्याने स्वतःलं संपवलं होतं... बहीण म्हणाली..., सोशल मीडियावर आजही व्हायरल होत असतात अभिनेत्याचे फोटो, व्हिडीओ...

सुशांतच्या मृत्यूला 4 वर्ष पूर्ण, मन हेलावणारा व्हिडीओ समोर, बहीण म्हणाली, तुझा मृत्यू एक रहस्य आणि...
सुशांत सिंह राजपूत
| Updated on: Jun 14, 2024 | 12:29 PM

बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरी देखील अभिनेत्याचं निधन एक रहस्यच आहे. सुशांत याच्या मृत्यूनंतर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. दरम्यान, अभिनेत्याच्या बहिणीने देखील काही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. व्हिडीओ मन हेलावणारे आहेत. कारण त्यातील एका व्हिडीओमध्ये सुशांत त्याच्या बहिणींसोबत आनंदी दिसत आहे. भावाच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत श्वेता सिंह हिने भावूक पोस्ट देखील लिहिली आहे.

भावासोबतच्या आठवणी ताज्या करत श्वेता सिंह म्हणाली, ‘भाई…. 4 वर्ष झालीत तू आम्हाला सोडून गेला आहेस आणि आम्हाला आजही नाही माहिती की 14 जून 2020 रोजी नक्की काय झालं होतं. तुझा मृत्यू अद्यापही रहस्य आहे. मला असहाय्य वाटत आहे आणि मी अनेक वेळा अधिकाऱ्यांना सत्यासाठी आवाहन केलं आहे. मी माझा संयम गमावत आहे आणि मला हार मानावीशी वाटते.’

 

 

पुढे अभिनेत्याची बहीण म्हणाली, ‘पण आज, शेवटच्या वेळी, मला या प्रकरणात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारायचे आहे, तुमच्या मनावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा: आमचा भाऊ सुशांतचं नक्की काय झालं हे जाणून घेण्याची आमची लायकी नाही का? हा राजकीय अजेंडा का बनला आहे? त्या दिवशी जे सापडलं आणि जे घडलं ते सांगण्याइतके सोपं का असू शकत नाही? … सध्या सर्वत्र श्वेता सिंह हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, 2020 मध्ये आजच्या दिवशी सुशांत सिंह राजपूत वांद्रे येथील राहात्या घरी मृत अवस्थेत आढळला. अभिनेत्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी संताप देखील व्यक्त केला होता.

अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी देखील जाळ्यात अडकले होते. सुशांत याच्या मृत्यूप्रकरणी अनेकांनी चौकशी देखील झाली होती. अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला तुरुंगाची हवा देखील खावी लागली होती. पण अभिनेत्याने यशाच्या शिखरावर असताना का टोकाचं पाऊल उचललं? याचं कारण समोर आलेलं नाही.

 

Follow Us