AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतचा ‘हा’ चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये होणार प्रदर्शित; चाहत्यांमध्ये उत्सुकता

14 जून 2020 रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्या घटनेच्या तीन वर्षांनंतरही चाहते सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्याप सावरले नाहीत. सुशांतने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या होत्या.

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतचा 'हा' चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये होणार प्रदर्शित; चाहत्यांमध्ये उत्सुकता
Sushant Singh RajputImage Credit source: Instagram
| Updated on: May 05, 2023 | 8:17 AM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. त्या घटनेच्या तीन वर्षांनंतरही चाहते सुशांतच्या मृत्यूच्या धक्क्यातून अद्याप सावरले नाहीत. त्याच्या ‘दिल बेचारा’ या शेवटच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. लॉकडाऊनमध्ये हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला होता. सुशांतने त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकीच एक भूमिका म्हणजे क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची. ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपिकमध्ये त्याने धोनीची भूमिका साकारली होती. आता हा चित्रपट पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे.

सुशांतच्या निधनाला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र आजही तो विविध भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. सुशांतचा एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट येत्या 12 मे रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तमिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

महेंद्र सिंह धोनीचा हा बायोपिक 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून धोनीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला होता. सुशांतसोबतच त्यामध्ये अनुपम खेर, भूमिका चावला, कियारा अडवाणी आणि दिशा पटानी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. सुशांतने या चित्रपटात धोनीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

एम. एस. धोनी या चित्रपटात भूमिका चावलाने सुशांतच्या ऑनस्क्रीन बहिणीची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला होता. “एम. एस. धोनी या चित्रपटासाठी शूटिंग करताना आम्हा दोघांचे सीन्स एकत्र फार दिवस नव्हते. रांचीमधील काही सीन्स आम्ही एकत्र शूट केले होते. तेव्हा सुशांत त्याच्या आयुष्याविषयी आणि इतर बऱ्याच गोष्टींविषयी गप्पा मारायचा. आपण सर्वजण माणूस आहोत, सर्वांच्या आत काही भावना दडलेल्या असतात, हे मला त्यावेळी जाणवलं. माझा मुलगा तेव्हा फक्त एक वर्षाचा होता आणि मी शूटिंगदरम्यान सुशांतच्या गप्पा ऐकत बसायचे”, असं भूमिका म्हणाली होती.

सुशांतच्या मृत्यूबद्दल जेव्हा भूमिकाला कळलं तेव्हा तिला मोठा धक्का बसला होता. “त्या धक्क्यातून मी बरेच दिवस सावरले नव्हते”, असं तिने सांगितलं होतं. त्याचप्रमाणे सुशांतच्या मृत्यूचं वृत्त ज्याप्रकारे त्यावेळी माध्यमांमध्ये कव्हर केलं गेलं, त्याविषयीही भूमिका मोकळेपणे व्यक्त झाली.

एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....