Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणी धक्कादायक सत्य, तिने केलेला फोन आणि ‘ते’ 6 शब्द…

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं धक्कादायक सत्य, 'मार्चनंतर तो जिवंत राहणार नाही...', तिने केलेला फोन आणि ते 6 शब्द, वेळीच लक्ष दिलं असतं तर..., आजही सुशांतच्या आत्महत्येबद्दल धक्कादायक गोष्टी समोर येत असतात...

Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणी धक्कादायक सत्य, तिने केलेला फोन आणि ते 6  शब्द...
फाईल फोटो
| Updated on: Nov 02, 2025 | 8:32 AM

Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाची बातमी समोर आली आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. 14 जून 2020 मध्ये अभिनेत्याने राहत्या घरी स्वतःला संपवलं… अभिनेत्याच्या निधनाला 5 वर्ष झाली आहेत पण आज देखील #जस्टिस फॉर सुशांत ट्रेंड करत आहे. दरम्यान, न्यायालयाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करत अभिनेत्याने आत्महत्या केल्याचा निकाल सुनावर.. तर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुशांत याची बहीण श्वेता सिंग राजपूत हिने धक्कादायक खुलासे केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून श्वेता, सुशांतच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एका पॉडकास्टमध्ये श्वेता हिने एका फोन कॉलबद्दल सांगितलं. ‘मार्च 2020 नंतर तो जिंवत राहणार नाही…’ असं सांगितलं… पण अभिनेत्या कुटुंबियांनी फारसं लक्ष दिलं नाही…

सुशांतची बहीण श्वेता म्हणाली, ‘सुशांतच्या मृत्यूपूर्वी एका सायकिक (Phychic) चा माझ्या मोठ्या बहिणीला फोन आलेला. ती म्हणाली सुशात याल भावनात्मक दृष्ट्या खचवण्यासाठी त्याच्या काळी जादू केली जात आहे आणि 2020 नंतर तो जिवंत राहू शकणार नाही…’ असं देखील अभिनेत्याच्या कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं.

पुढे श्वेता म्हणाली, ‘काळी जादू, तांत्रिक याच्यावर आम्हाला विश्वास नव्हता… आम्ही एका वैज्ञानिक कुटुंबातील आहोत, म्हणून आम्हाला असं वाटत नव्हतं की अशा गोष्टी अस्तित्वात आहेत. भाई बॉलिवूडमध्ये स्वतःचं नाव कमावत होता. म्हणून असं झालं तर काही सांगता येत नाही.. ‘

‘काळ्या जादू यांसारख्या गोष्टींवर मला विश्वास नाही. पण भाईच्या निधनानंतर मी सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केला… प्रत्येक गोष्टीवर मी प्रश्न उपस्थित केले…’ असं देखील श्वेता म्हणाली. सांगायचं झालं तर, सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्याचं कुटुंब आजही सावरलेलं नाही… अभिनेत्याची बहीण श्वेता कायम  सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न करत असते.

सुशांत सिंग राजपूत यांचं निधन… 

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या निधनानंतर आजही अभिनेत्याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांच्या मनात देखील अभिनेत्याचं आजही राज्य आहे. 14 जून 2020 मध्ये सुशांत याने मुंबई येथील राहत्या घरी गळफास घेत स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली…