AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता सेन करणार लग्न? चर्चांवर अखेर सोडलं मौन

अभिनेत्री सुष्मिता सेन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गेल्या काही वर्षांपासून ती रोहमन शॉलला डेट करतेय. या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. मध्यंतरीच्या काळात त्यांनी ब्रेकअप केल्याचं जाहीर केलं होतं. मात्र पुन्हा एकदा दोघं एकत्र आले.

वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता सेन करणार लग्न? चर्चांवर अखेर सोडलं मौन
Sushmita Sen and Rohman ShawlImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 07, 2024 | 10:31 AM
Share

मुंबई: 7 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या बेधडक आणि मोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. सुष्मिता गेल्या काही काळापासून रोहमन शॉलला डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. मात्र पुन्हा हे दोघं एकत्र आले. त्यामुळे वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता रोहमनशी लग्न करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यावर तिने या मुलाखतीत उत्तर दिलं आहे. लग्न करण्याचा कोणताच प्लॅन नसल्याचं तिने स्पष्ट केलंय. “मला माहितीये की अख्ख्या जगाला असं वाटतंय की किमान या वयात तरी मी लग्नाचा गांभीर्याने विचार करावा. मात्र मला त्याने काहीच फरक पडत नाही”, असं सुष्मिता म्हणाली.

“लग्न करण्याला मी फारसं महत्त्व देत नाही हे बोलताना मी असंही स्पष्ट करू इच्छिते की लग्नसंस्थेवर मला प्रेम आणि आदर आहे. मी माझ्या आयुष्यात खूप चांगली जोडपी पाहिली आहेत. माझ्यासमोरच ‘आर्या’ या वेब सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानी यांचं उत्तम उदाहरण आहे. मला माहित असलेल्या जोडप्यांपैकी ते सर्वांत सुंदर आणि चांगले आहेत. पण मला मैत्री या संकल्पनेवर अधिक विश्वास आहे आणि जर का ती मैत्री असेल तर गोष्टी घडतील. पण नात्यात तो आदर आणि ती मैत्री माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यासोबतच स्वातंत्र्यही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी स्वातंत्र्याला आणि माझ्या कामाला अधिक महत्त्व देते”, अशा शब्दांत सुष्मिता व्यक्त झाली.

सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत असले तरी अद्याप दोघांनीही प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही. 2018 मध्ये हो दोघं डेट करू लागले आणि त्यानंतर 2021 मध्ये इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी ब्रेकअपचा खुलासा केला. ब्रेकअपनंतरही दोघं विविध पार्ट्यांमध्ये, डिनर डेटला एकत्र दिसले. ‘आमची सुरुवात मैत्रीने झाली, आम्ही कायम एकमेकांचे मित्र राहू. नातं कधीच संपलं होतं.. पण त्यातील प्रेम नेहमीच टिकून राहील’, असं लिहित सुष्मिताने ब्रेकअपची माहिती दिली होती.

गेल्या वर्षी दिवाळीत सुष्मिता आणि रोहमन हे निर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता यांच्या पार्टीत एकत्र दिसले होते. गेल्या महिन्यात मुंबईत या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. सुष्मिताने एकल मातृत्व स्वीकारलं असून अलिसाह आणि रिनी या तिच्या दोन मुली आहेत. 2000 मध्ये तिने रिनीला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर 2010 मध्ये तिने अलिसाहला दत्तक घेतलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...