Charu Asopa: चारू-राजीवची मुलगी देतेय या गंभीर आजाराशी झुंज, सुष्मिता सेनची वहिनी एकटीच करतेय मुलीचा सांभाळ

| Updated on: Jul 27, 2022 | 1:14 PM

गेल्या काही दिवसांपासून चारू असोपा आणि राजीव सेन एकमेकांवर विविध आरोप करत आहेत. त्यामुळे या दोघांचं नातं सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. आता या भांडणांदरम्यान चारूने तिची मुलगी जियानाबद्दल खुलासा केला आहे.

Charu Asopa: चारू-राजीवची मुलगी देतेय या गंभीर आजाराशी झुंज, सुष्मिता सेनची वहिनी एकटीच करतेय मुलीचा सांभाळ
Rajiv Sen and Charu Asopa
Image Credit source: Instagram
Follow us on

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि तिचं संपूर्ण कुटुंब सध्या चर्चेत आहे. एकीकडे व्यावसायिक ललित मोदी यांच्यासोबतच्या रिलेशनशिपमध्ये सुष्मिता चर्चेत आहे तर दुसरीकडे तिचा भाऊ राजीव सेन (Rajiv Sen) आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांच्या घटस्फोटाचीही जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून चारू असोपा आणि राजीव सेन एकमेकांवर विविध आरोप करत आहेत. त्यामुळे या दोघांचं नातं सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. आता या भांडणांदरम्यान चारूने तिची मुलगी जियानाबद्दल खुलासा केला आहे. चारूने एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे की तिची मुलगी एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे.

राजीव सेन आणि चारूची मुलगी या आजाराने आहे ग्रस्त

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा हिने नुकताच तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं की तिची लहान मुलगी जियाना हिला HFMD नावाच्या आजाराने ग्रासले आहे. हा लहान मुलांचा विषाणूजन्य आजार आहे. आपल्या मुलीच्या आजाराबद्दल बोलताना चारू खूपच भावूक झाली. जियाना काही खायलाही सक्षम नाही. सध्या ती एकटीच आपल्या मुलीची काळजी घेत आहे.

हे सुद्धा वाचा

जियाना काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नाही

तिच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ शेअर करताना चारू म्हणाली, “जियाना हात, पाय आणि तोंडाच्या एका विशिष्ट आजाराने त्रस्त आहे. मी प्रत्येक क्षण सावलीप्रमाणे तिच्यासोबत राहत आहे. माझ्या मुलीला यावेळी एकटं वाटू नये याची काळजी मी घेत आहे. तिच्या चेहऱ्यावर, पायांवर, हातावर आणि घशाच्या आत फोड आले आहेत. ती काही खाऊही शकत नाही. माझी मुलगी इतकी अस्वस्थ आहे की ती फक्त रडत असते. या आजारावर औषधं सुरू आहेत.

व्हिडिओमध्ये मुलीच्या प्रकृतीची माहिती देण्याबरोबरच चारूने असंही सांगितलं की, “मी जियानाला रात्री अडीच वाजल्यानंतर एकटीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. मी एकटी आहे पण मी धैर्य एकवटून माझ्या मुलीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण जियानाला दवाखान्यात घेऊन जाताना मी खूप घाबरले होते आणि रडू लागले होते. मी सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की जीवनात जेव्हा आव्हानं समोर येतात तेव्हा त्यांना संयमाने आणि शांत मनाने कसं हाताळायचं हे जाणून घेतलं पाहिजे.”