सुष्मिता सेन ‘आत्या’ झाली, अभिनेत्री चारू असोपा-राजीव सेन यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!

टीव्ही मालिका ‘मेरे अंगने में’ फेम अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि तिचे पती राजीव सेन (Rajeev Sen) आता एका मुलीचे पालक बनले आहेत. राजीवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर कुटुंबाच्या फोटोंसह भावनिक संदेश लिहित ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

सुष्मिता सेन ‘आत्या’ झाली, अभिनेत्री चारू असोपा-राजीव सेन यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!
Rajiv and Charu with baby
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Nov 01, 2021 | 3:48 PM

मुंबई : टीव्ही मालिका ‘मेरे अंगने में’ फेम अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि तिचे पती राजीव सेन (Rajeev Sen) आता एका मुलीचे पालक बनले आहेत. राजीवने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर कुटुंबाच्या फोटोंसह भावनिक संदेश लिहित ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.

सोशल मिडियावरील हे पहिले फोटो दाखवतात की, या जोडप्यासाठी हा एक भावूक क्षण होता, जेव्हा त्यांनी त्यांच्या लहान बाळाला पहिल्यांदा हातात धरले होते. राजीवने आपल्या पोस्टमध्ये आई आणि बाळ दोघेही ठीक असल्याचे देखील म्हटले आहे. त्याने चारूला या वेदनादायी प्रसंगातही मजबूत राहिल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.

त्याने लिहिले, ‘आमच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे. चारू आता छान आणि तंदुरुस्त आहे.. शेवटपर्यंत खंबीर राहिल्याबद्दल माझ्या पत्नीचा मला अभिमान आहे.. तुमच्या प्रार्थनांबद्दल सर्वांचे आभार.. देवाचे आभार.’ सेन आणि असोपा कुटुंब बरेच दिवस या क्षणाची वाट पाहत होते.

पाहा पोस्ट :

View this post on Instagram

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

‘ते’ खूप भावनिक क्षण होते!

चारू असोपाने या वर्षी मे महिन्यात गर्भवती असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. पहिल्यांदाच आई बनत असलेल्या अभिनेत्रीने माध्यमांशी खास गप्पा मारत, तिच्या गरोदरपणाचे पहिले काही भावनिक क्षण शेअर केले होते.

याविषयी बोलताना चारू म्हणाली होती की, ‘राजीव आणि मी हे खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो, पण तुम्हाला माहिती आहे की, तुमच्या प्लॅनिंगनुसार या गोष्टी कधीच घडत नाहीत. जेव्हा आम्ही हार मानली, तेव्हा आम्हाला एक सरप्राईज मिळालं. मला माझ्या चौथ्या आठवड्यात ही आनंदाची बातमी कळली. मला ही आतून खूप वाटत होते की, मी एक चाचणी केली पाहिजे आणि जेव्हा मी केली तेव्हा पहिली चाचणी नकारात्मक आली, परंतु दुसरी चाचणी सकारात्मक आली.’

ती पुढे म्हणाली होती, ‘मला तोपर्यंत चाचण्या करायची इतकी सवय झाली होती की, ती निगेटिव्ह येणार यासाठी म्हणून मी मनाने तयार झाले होते, पण अचानक मला हे सरप्राईज मिळाले. हा राजीव आणि माझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे. मी माझ्या पहिल्या बाळाला नोव्हेंबरमध्ये जन्म देणार आहे.’

सुष्मितानेही व्यक्त केला आनंद!

राजीवची बहीण अभिनेत्री सुष्मिता सेन हिनेही ‘आत्या’ बनण्याबद्दलचा आनंद शेअर केला होता. तिच्या पोस्टच्या एका भागामध्ये असे लिहिले होते, ‘मी तुम्हा सर्वांसोबत ही अद्भुत बातमी शेअर करण्यासाठी कधीपासून वाट पाहत होते!! मी आता आत्या होणार आहे!! माझी सुंदर मेहुणी @asopacharu आणि भाऊ राजीव यांना त्यांच्या या आनंदमे प्रवासाबद्दल अभिनंदन.!’

हेही वाचा :

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल!

Abhishek-Aishwarya Love Story | चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा कशी होती अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकथा…

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें