AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळी पार्टीनंतर कॅमेरासमोर सुझानने बॉयफ्रेंडला केलं किस; भडकलेले नेटकरी म्हणाले..

सुझान-अर्सलानचा रोमँटिक अंदाज; व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दिवाळी पार्टीनंतर कॅमेरासमोर सुझानने बॉयफ्रेंडला केलं किस; भडकलेले नेटकरी म्हणाले..
सुझान खान, अर्सलान गोणीImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 24, 2022 | 1:44 PM
Share

मुंबई- देशभरात दिवाळी सणाचा उत्साह पहायला मिळतोय. सर्वसामान्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत.. प्रत्येकजण दिवाळीच्या जल्लोषात मग्न आहे. दिवाळीनिमित्त गुलशन कुमार यांचा भाऊ कृष्ण कुमार यांनी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र त्यात सुझान खानने (Sussanne Khan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुझान तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोणीसोबत (Arslan Goni) या पार्टीला पोहोचली होती. मात्र या दोघांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

कृष्ण कुमार यांच्या पार्टीला बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. मात्र सुझान आणि अर्सलानने पापाराझी आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये या दोघांचा रोमँटिक अंदाज पहायला मिळाला.

दिवाळीच्या पार्टीतून बाहेर येताना अर्सलान आणि सुझान एकमेकांना प्रेमाने निरोप देताना दिसत आहेत. याचवेळी सुझान पापाराझींसमोर अर्सलानला किस करते. या दोघांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याच व्हिडीओमुळे सुझानला ट्रोल केलं जातंय.

पहा व्हिडीओ-

‘कॅमेरासमोरच हे सर्व करण्याची गरज आहे का,’ असा खोचक सवाल एका नेटकऱ्याने केला. तर सुझान आणि अर्सलानने मुद्दाम कॅमेरासमोर येऊन किस केलं, जेणेकरून त्यांना पब्लिसिटी मिळेल, असं दुसऱ्याने म्हटलं. काहींनी सुझानला तिच्या कपड्यांवरूनही ट्रोल केलं.

सुझान आणि अर्सलान हे गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. या दोघांच्या व्हेकेशनचेही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. तर दुसरीकडे सुझानचा पूर्वाश्रमीचा पती हृतिक रोशन हा अभिनेत्री सबा आझादला डेट करतोय.

सुझान खान आणि हृतिक रोशनने 2000 साली लग्नगाठ बांधली. दोघांनी 2014 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. विभक्त होऊनही दोघे चांगले मित्र आहेत. त्यांच्या दोन्ही मुलांसाठी दोघेही नेहमी एकत्र येतात. लॉकडाऊनमध्येही सुझान आणि हृतिक मुलांसाठी एकत्र राहिले होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.