
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. यातील प्रत्येक कलाकार लोकप्रिय असून गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मालिकेतील हे कलाकार खऱ्या आयुष्यात कसे आहेत, त्यांचं कुटुंब कसं आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. त्यामुळे या कलाकारांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. ‘तारक मेहता..’मध्ये भिडे मास्तरांची पत्नी माधवी भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सध्या चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे सोनालिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले मुलीचे व्हिडीओ. ज्याप्रमाणे मालिकेत माधवी भाभीची ‘सोनू’ ही मुलगी आहे. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातही सोनालिकाची एक मुलगी असून तिचं नाव आर्या जोशी आहे.
आर्याचे काही व्हिडीओ सोनालिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले असून त्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आर्याचं सौंदर्य पाहून तीसुद्धा भविष्यात अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवू शकते, असंही काही नेटकरी म्हणत आहेत. सोनालिकाची मुलगी आर्याला फार कोणी ओळखत नाही. ती लहान असताना अनेकदा सोनालिकाच्या मुलाखतींमध्ये झळकायची. परंतु आता आर्या बरीच मोठी आणि सुंदर झाली आहे. आर्याचं सौंदर्य हे बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देणारं असल्याचे कमेंट्स नेटकरी करत आहेत. आर्यासुद्धा तिच्या आईप्रमाणेच अत्यंत प्रतिभावान आहे.
आर्या जोशी सध्या ग्लॅमर विश्वापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय ठरतेय. तिला नृत्याची आणि गायनाची प्रचंड आवड आहे. सोनालिकाने आर्याच्या डान्सचे आणि गायनाचे काही व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका व्हिडीओमध्ये सोनालिक आणि आर्या दोघी एकत्र गाणं गाताना दिसून येत आहेत. या व्हिडीओमध्ये मायलेकीची प्रतिभा पाहून नेटकरीसुद्धा भारावले आहेत.
आर्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये आर्या खूप सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. तिची तुलना दीपिका पादुकोण, आलिया भट्ट यांसारख्या अभिनेत्रींशी नेटकरी करत आहेत. आर्याचा मॉडर्न अंदाज आणि त्याचसोबत साधेपणा हे कॉम्बिनेशन नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. तिची शैली तिच्या आईपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. आर्या सध्या तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून तिला लाइमलाइटपासून दूर राहायचं आहे. इन्स्टाग्रामवरील आर्याचं प्रोफाइल हे प्रायव्हेट असून तिचे फक्त 344 फॉलोअर्स आहेत.