
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसतंय. विशेष म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती या मालिकेची चाहती आहे. मात्र, मालिकेला घरघर लागल्याचे बघायला मिळतंय. अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला कायमचा रामराम केला. यासोबतच काहींनी तर मालिकेच्या निर्मात्यांवर थेट आरोप केली. जेठलाल आणि दयाबेन यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. दोघांमधील मस्ती, प्रेम आणि कॉमेडी हा प्रेक्षकांचा आवडता विषय.
गेल्या काही वर्षांपासून दयाबेन तारक मेहता मालिकेपासून दूर आहे. लग्नानंतर काही वर्ष दिशा वकानी मालिकेत दिसली मात्र, डिलीवरीसाठी सुट्टी घेतल्यानंतर दिशा वकानीचे अजून मालिकेत आगमन झाले नाहीये. आपल्या दोन्ही मुलांना आणि कुटुंबियांना वेळ दिशा वकानी देतंय. दिशा वकानी मालिकेत नेमकी कधी परतणार हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून विचारला जातोय.
विशेष म्हणजे ज्याप्रकारे चाहते हे दिशा वकानीला मिस करत आहेत, तसेच जेठालाल अर्थात दिलीप जोशी हे देखील दिशा वकानीला मिस करत आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना दिलीप जोशी यांनी म्हटले की, आम्ही 2008 ते 2017 पर्यंत एकत्र काम केले. मी खरोखरच त्यांना मिस करत आहे. आम्ही खूप काळ एकत्र काम केले. आम्ही थिएटरमध्ये काम केल्याने पहिल्या दिवसापासून आमच्यामध्ये चांगली केमिस्ट्री होती.
एक सहकलाकर म्हणून मला त्या आवडतात आणि मला त्यांची आठवण येते. आमच्या दोघांमधील सीन खूप जास्त मजेदार असलायचे. दिशा वकानीचा भाऊ मयूर वकानी यांनी यावेळी बोलताना म्हटले की, मी लहानपणापासून माझ्या बहिणीसोबत थिएटरमध्ये परफॉर्म केले. मी आसित सरांना धन्यवाद देतो की, त्यांनी हा प्रवास पुढे चालू ठेवण्याची एक संधी दिली. आता दिशा शोमध्ये नाहीये, पण आम्ही सर्वजण ज्यावेळी काम एकत्र करत होतो, त्यावेळी खूप धमाल केली.