घरी परतलेल्या गुरुचरण सिंगचा पहिला फोटो समोर, वाढलेली दाढी; वडील म्हणाले…

Gurucharan Singh missing case : 'तारक मेहका का उल्टा चष्मा' फेम रोशन सिंग सोढी अखेर घरी परतला, 25 दिवसांपासून बेपत्ता असलेला गुरुचरण सिंग आता कसा दिसतो? घरी परतल्यानंतर अभिनेत्याचा पहिला फोटो समोर... सध्या सर्वत्र गुरुचरण सिंग याची चर्चा...

घरी परतलेल्या गुरुचरण सिंगचा पहिला फोटो समोर, वाढलेली दाढी; वडील म्हणाले...
| Updated on: May 18, 2024 | 1:08 PM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सर्वांना आपल्या विनोदबुद्धीने हसवणारा रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग गेल्या 25 दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर अभिनेता 17 मे रोजी घरी परतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा रंगली आहे. 25 दिवसांनंतर अभिनेत्याचा पहिली फोटो समोर आला आहे. एएनआयने शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत गुरुचरणचा फोटो ट्विटवर पोस्ट केला आहे. फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.

फोटोमध्ये गुरुचरण सिंग याने पट्टेदार पगडी आणि काळा टी-शर्ट घातलेला. अभिनेत्याला वाढलेल्या दाढीमध्ये पाहिल्यानंतर चाहते गुरुचरण याला वृद्ध समजत आहेत. पण 25 दिवसांनंतर अभिनेता पुन्हा घरी परतल्यामुळे कुटुंबिय आणि चाहत्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

 

 

घरी परतल्यानंतर लगेचच, दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याची चौकशी केली आणि स्थानिक न्यायालयात अभिनेत्याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. अभिनेता म्हणाला, दुनियादारी सोडून धार्मिक प्रवासासाठी गेलो होतो. कधी अमृतसर तर कधी लुधियानातील गुरुद्वारामध्ये राहत होतो. अखेर कळंल की आता घरी जायला हवं… म्हणून पुन्हा घरी आलोय… असं देखील अभिनेता चौकशीमध्ये म्हणाला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्याच्या वडिलांनी देखील मुलगा घरी आल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ‘त्याची प्रकृती ठिक आहे. गुरुचरणचं कोणी अपहरण केलं नव्हतं. तो घरी परत आला आहे. आम्ही पोलिसांना सर्वकाही सांगितलं आहे..’ सांगायचं झालं तर, अभिनेत्याची कोणतीही माहिती मिळत नसल्यामुळे गुरुचरण याच्या वडिलांना तक्रार दाखल केली होती.

गुरूचरण सिंग वडिलांचा वाढदिवस सारजा केल्यानंतर 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईकडे येण्यासाठी निघाला होता. पण 26 तारखेपर्यंत अभिनेता मुंबईत पोहोचलाच नाही. अभिनेत्याचा मोबाईल देखील बंद होता. अशात गुरुचरण याच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. पण आता अभिनेता घरी आल्यामुळे सर्व चर्चांनी पूर्णविराम लागला आहे.