‘तारक मेहता..’ मधील रोशन सोढी का झाला होता बेपत्ता? अखेर अभिनेत्याने सोडलं मौन

Gurucharan Singh missing case : 'योग्य वेळ आल्यानंतर...', 'तारक मेहता का उल्ट चष्मा' फेम रोशन सोढी का झाला होता बेपत्ता? अखेर अभिनेत्याने सोडलं मौन, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा सुरु आहे.

तारक मेहता.. मधील रोशन सोढी का झाला होता बेपत्ता? अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
| Updated on: May 28, 2024 | 3:45 PM

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत सर्वांना आपल्या विनोदबुद्धीने हसवणारा रोशन सिंग सोढी म्हणजे अभिनेता गुरुचरण सिंग मे महिन्यात तब्बल 25 दिवस बेपत्ता होता. अभिनेत्याला शोधण्यासाठी मुंबई, दिल्ली, पोलीस कसून चौकशी करत होते. पण पोलिसांच्या हाती अभिनेता लागला नाही. अखेर अभिनेता स्वतःच 25 दिवसांनंतर घरी परतला. घरी परतल्यानंतर अभिनेत्याचा फोटो देखील समोर आला. आता अभिनेत्या मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र गुरुचरण सिंग याची चर्चा सुरु आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘सध्या यावर मी काहीही बोलू शकत नाही कारण काही कायदेशीर प्रक्रिया बाकी आहेत. ज्यामुळे मी नंतर सर्वकाही सांगेल. काहीही वक्तव्य करण्याआधी मला काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. एकदा सर्व प्रक्रिय पूर्ण झाल्यानंतर मी सर्वकाही बोलेल.’ असं अभिनेता म्हणाला.

पुढे गुरुचरण सिंग म्हणाला, ‘माझ्याकडून जे काही पूर्ण करायचं होतं ते झालं आहे. आता आई – वडीयांकडून काही कायदेशीर प्रक्रिया बाकी आहेत. निवडणुकीचं वातावरण असल्यामुळे मी थोडी प्रतीक्षा केली. न्यायालयाची देखील प्रक्रिया सध्या बाकी आहे. मी असा निर्णय का घेतला? सर्व काही योग्य वेळ आल्यानंतर सांगेल…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

स्वतःच्या आरोग्याबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आता माझी प्रकृती स्थिर आहे. डोकेदुखी त्रास होता. पण आता सर्वत्रकाही ठिक आहे. हळू हळू सर्व काही ठिक होईल…’ असं देखील गुरुचरण सिंग म्हणाला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा सुरु आहे.

सांगायचं झालं तर, गुरूचरण सिंग वडिलांचा वाढदिवस सारजा केल्यानंतर 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईकडे येण्यासाठी निघाला होता. पण 26 तारखेपर्यंत अभिनेता मुंबईत पोहोचलाच नाही. त्यामुळे अभिनेत्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, अभिनेत्याबद्दल अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या.

गुरुचरण याने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत रोशन सिंग सोढी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण काही महिन्यांपूर्वी अभिनेत्या मालिकेचा निरोप घेतला होता. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून गुरुचरण कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायचा. अभिनेता सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.