
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू ही इंडस्ट्रीत एक मोठे नाव आहे. तब्बूने तिच्या 30 ते 40 वर्षांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. केवळ बॉलिवूडच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक ताऱ्यांसोबत तिने उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. चित्रपटांसोबतच तब्बू तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिली आहे. असे म्हटले जात आहे की तब्बू जवळपास 27 वर्षांनंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत पुन्हा चित्रपटात काम करणार आहे. हा सुपरस्टार अभिनेता कोण होता? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
तब्बूचे यशस्वी करिअर
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने तिच्या दीर्घ करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. तिने केवळ बॉलिवूड स्टार्ससोबतच नाही, तर दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्ससोबतही चित्रपट केले आहेत. तब्बूला इंडस्ट्रीत 30 ते 40 वर्षे झाली असून, आजही ती तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसते. तब्बू तिच्या चित्रपटांमुळे जितकी चर्चेत असते, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
वाचा: एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, बाळासाहेबांनी मिटवलेलं प्रकरण काय?
27 वर्षांनंतर एक्स बॉयफ्रेंडसोबत करणार काम
मिळालेल्या माहितीनुसार, तब्बू 27 वर्षांनंतर तिचा सहकलाकार आणि एक्स-लव्हर नागार्जुन अक्किनेनी याच्यासोबत पडद्यावर एकत्र दिसू शकते. नागार्जुन यांचा आगामी चित्रपट हा त्यांचा 100 वा चित्रपट असणार आहे, ज्याचं नाव सध्या ‘किंग 100’ असं म्हटले जात आहे. या चित्रपटात हे दोन्ही स्टार्स एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.
नागार्जुन यांचा 100वा चित्रपट
एका अहवालानुसार, नागार्जुन यांच्या 100व्या चित्रपटात तब्बू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिची भूमिका खूप महत्त्वाची असेल आणि कथेला पुढे नेण्याचं काम करेल. मात्र, या केवळ चर्चा आहेत, कारण अद्याप स्टार्स किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण जर ही बातमी खरी ठरली, तर हे दोन्ही कलाकार जवळपास 27 वर्षांनंतर एकत्र मोठ्या पडद्यावर परतू शकतात. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत खूप उत्साह आहे आणि चाहते चित्रपटाबाबत खूप उत्साहित आहेत.
27 वर्षांपूर्वी केलं होतं एकत्र काम
या चित्रपटाचे नाव ‘लॉटरी किंग’ असू शकतं. हा चित्रपट तमिळ दिग्दर्शक आर.ए. कार्तिक दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट एक कौटुंबिक अॅक्शन ड्रामा असू शकतो. तब्बू आणि नागार्जुन यांनी शेवटचे 1998 मध्ये ‘आविडा मा आविदे’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात हीरा राजागोपाल देखील मुख्य भूमिकेत होती. त्याकाळी नागार्जून विवाहीत असून देखील तब्बूच्या प्रेमात असल्याते म्हटले जात होते.